खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
महत्वाचे

शहर आणि ग्रामीण भागातील बांधकामाची कामे तात्काळ बंद करण्याचे दिले आदेश

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचाही तहसीदरांनी दिला इशारा

अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर व तालुक्यातील बांधकामाचे कामे बंद करण्याचे आदेश तहसीलदार मिलिंद वाघ यांनी मंगळवारी दिले. यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत होणार आहे.
तहसीलदार मिलिंद वाघ यांनी दिलेल्या आदेशात म्हटेल आहे की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशामध्ये पसरत असल्यामुळे त्यापासून बचाव करण्यासाठी संपूर्ण नागरी भागामध्ये ३१ मार्चपर्यंत कलम १४४ जमाव बंदी व संचार बंदी देखील लागू करण्यात आलेली आहे.
शहर व तालुक्यामध्ये बांधकाम क्षेत्राशी निगडीत कामे सुरू असल्यास सदर कामे तात्काळ बंद करण्यात यावी व कामावर एकही मजूर येणार नाही याची खात्री करावी. सदर सूचनेचे काटेकोरपणे पालन करावे. अन्यथा नियमानुसार कारवाई करणेत येईल,असे आदेश देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button