राज्यभरात २२ हजार ११८ खोल्यांची सज्जता; ५५ हजार ७०७ खाटांची सोय – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती
????रोनाविरूद्धच्या लढाईत खबरदारीची उपाययोजना म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात तब्बल २२ हजार ११८ खोल्यांची सज्जता करण्यात आली असून, या ठिकाणी ५५ हजार ७०७ खाटांची सोय होऊ शकेल. सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे.
????यासंदर्भात मंत्री श्री. चव्हाण म्हणाले, कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
करोना: शेअर बाजाराचे ५२ लाख कोटी बुडाले
???? करोनाच्या संकटाने मागील महिनाभरात जगभरातील भांडवली बाजारात जोरदार पडझड झाली आहे. मुंबई शेअर बाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअर बाजाराला (NSE) करोनाचा जोरदार तडाखा बसला असून आतापर्यंत गुंतवणूकदारांचे तब्बल ५२ लाख कोटींचे नुकसान झाले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या (जीडीपी) ४० टक्के मालमत्तेचा या भीषण पडझडीत चुराडा झाला आहे.
????मागील ४४ सत्रांमध्ये शेअर निर्देशांकात आतापर्यंत ३७ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या (जीडीपी) ४० टक्के मालमत्तेचा या भीषण पडझडीत चुराडा झाला आहे. शेअरमधील घसरण कधी थांबेल, याबाबत गुंतवणूक तज्ज्ञांना देखील अंदाज व्यक्त करणे कठीण झाले आहे. करोनामुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली असून देशात लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे.
????शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३१ डिसेंबर २०१९ अखेर १५५.५३ लाख कोटी होते. आज २४ मार्च रोजी ते १०३.६९ लाख कोटी इतके खाली आले आहे. यात ५२ लाख कोटींची घसरण झाली आहे. मागील दोन आठवड्यात दोन्ही शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. १० दिवसांत दोनदा सेन्सेक्सला लोअर सर्किट लागले होते. सोमवारी सेन्सेक्स ४००० अंकांनी कोसळला. यात गुंतवणूकदारांनी १४ लाख कोटी गमावले. अल्जेरिया या देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेपेक्षाही ही रक्कम मोठी आहे.
????शेअर बाजारातील पडझडीने किरकोळ गुंतवणूकदारांबरोबरच बडे उद्योजक आणि अब्जाधिशांना जबर दणका बसला आहे. भारतातील १४ आघाडीच्या अब्जाधिशांची संपत्ती जवळपास ४ लाख कोटींनी कमी झाली आहे. यातील अव्वल दोन उद्योजकांची संपत्ती १.८५ लाख कोटींनी कमी झाली. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत देखील मोठी घसरण झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर ४१ टक्क्यांनी कोसळला आहे. स्टील किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्मी निवास मित्तल, गौतम अदानी, अझीम प्रेमजी, उदय कोटक, शिव नाडार यांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली आहे.
???? दरम्यान, सोमवारच्या पडझडीतून आज शेअर बाजार सावरले. करोना रोखण्यासाठी सरकारची उपाययोजना आणि करदात्यांसाठी रिटर्न फायलिंगची मुदतवाढ दिल्याने गुंतवणूकदारांनी आज बाजारात खरेदी केली. यामुळे बऱ्याच दिवसांनंतर सेन्सेक्सने सकारात्मक सुरुवात केली. सेन्सेक्स १३०० अंकांनी वधारला. निफ्टीत ४५० अंकांची वाढ झाली होती. दिवसअखेर तो ६९२ अंकांनी वधारला आणि २६६७४ अंकावर बंद झाला. निफ्टी १९० अंकांच्या वाढीसह ७८०१ अंकावर स्थिरावला.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
खडक समूह व त्याचा महाराष्ट्रतील विस्तार
????गाळाची जमीन व जांभा खडक:4.7%
????दक्खन चा काळा खडक:81.3%
????अप्पर गोंडवाना समूह: 1.5%
????कडाप्पा खडक:2.0%
????कब्रियन समूह: 10.5%
बिपिन चंद्र पाल यांची पत्रकारिता
परिदर्शक (1880) ✅
बंगाल पब्लिक ओपिनियन ( 1882)
लाहौर ट्रिब्यून (1887)
द न्यू इंडिया (1892)
द इंडिपेंडेंट, इंडिया (1901)
बन्देमातरम (1906, 1907)
स्वराज (1908 -1911)
द हिन्दू रिव्यु (1913)
द डैमोक्रैट (1919, 1920)
बंगाली (1924, 1925)
???? शिकवण ???? #Buddha
भगवान बुद्धांनी ‘पाली’ या लोकभाषेतून अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण, आचार-विचार सांगितले. बुद्धांनी धर्माची शिकवण व आचरण यासाठी चार आर्यसत्ये, अष्टांग मार्ग (मध्यम मार्ग) व पंचशीले सांगितली. .
????चार आर्यसत्ये????
भगवान बुद्ध म्हणतात, ‘‘मानवी जीवन हे दुःखमय आहे, दुःखाची निर्मिती तृष्णेतून (वासना, इच्छा, आसक्ती, आवड) होते, म्हणून या तृष्णेवर म्हणजे आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. यासाठी मध्यम मार्गाचा अवलंब केला पाहिजे. मानवी व्यवहाराच्या मुळाशी चार आर्यसत्ये आहेत.
१. दुःख :- मानवी जीवन हे दुःखमय आहे.
२. तृष्णा :- मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा हे दुःखाचे कारण आहे.
३. दुःख निरोध :- दुःखाचे निराकरण वा अंत सर्व प्रकारची आसक्ती सोडण्याने होतो.
४. प्रतिपद् :- दुःख निवारण्यासाठी सदाचाराचा मार्ग (अष्टांग मार्ग) आहे.