खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कुंटनखाने बंद करा : सैय्यद कुदरत अली यांची मागणी 

अमळनेर (प्रतिनिधी) करोना पार्श्वभूमीवर कुंटणखाने तात्काळ बंद करण्यात यावेत, आशी मागणी सैय्यद कुदरत अली यांनी  उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे व भुसावळ येथील उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी निवेदन ही दिले आहे.
अमळनेर शहरातील गांधलीपुरा दर्गा अली मोहल्ला येथील रहिवासी कार्यकर्ते सैय्यद कुदरत अली यांनी औरंगाबाद येथे उच्च न्यायालयात कुंटणखाने बंद करण्यासाठी याचिका दाखल केली होती. सदर उच्च न्यायालयाने शहरातील कुंटणखाने बंद करण्याचे आदेश दिले होते. परंतु आजच्या तारखेला कुंटणखाना खुलेआम सुरू आहे. न्यायालयाने बंद होणेबाबत निर्देश असुन सुद्धा न्यायालयाचे अवमान करून त्याला न जुमानता सदर व्यवसाय राजरोसपणे खुले आम शहरामध्ये चालु आहे. दि १८ जानेवारी २०२० रोजी पोलीस अधीक्षक यांची समक्ष भेट घेऊन अर्ज दिलेला आहे.  तरी याबाबत कारवाई झाली नाही. तातडीने सदरील व्यवसाय बंद करण्यात यावे असे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. संपूर्ण देशभरात व जगात कोरोना व्हायरसचा आजार सुरू असुनही शहरात खुलेआम वेश्या व्यवसाय सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button