खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

कोरोना व्हायरसच्या धाकाने चिकनचा खप घटला, १५ ते ३८ रुपये किलोने कोंबड्यांची होतेय विक्री

शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी पोल्ट्री व्यावसायिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अमळनेर(प्रतिनिधी)करोना वायरसच्या अफवेमुळे चिकन खप अचानक कमी होऊन पोल्ट्री व्यवसायाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. १५ ते ३८ रुपये किलो कोंबड्या विकल्या जात आहे.
यापार्श्वभूमीवर तालुक्यातील असंख्य पोल्ट्री व्यासायिकांनी एकत्रित येत शासनाकडून नुकसानभरपाई मिळण्यासाठी जिल्हाधिकारी जळगाव आणि प्रांताधिकारी अमळनेर व तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की एक किलो बोयलर कोंबडी तयार करण्यासाठी ७५ रुपये खर्च येतो आणि आज रोजी भाव १५ रुपये प्रति किलो आहे.अडीच किलो वजनाच्या कोंबड्या तयार होण्यासाठी सुमारे १८८ रुपये खर्च येतो. पण आज अडीच किलो कोबडीचे विकून ३८ रुपये होतात. म्हणजे शेतक-यांच्या एकुण १५० रुपय तोटा प्रति पक्षी होत आहे. त्यामुळे पाच हजार पक्षी धारक शेतक-यांचे सात ते साडेसात लाख रुपयाच नुकसान होत आहे.तसेच कॉकरेल व गावरान पक्ष्यांमध्ये एक किलो कोंबडी तयार करण्यासाठी ११० रुपये खर्च येतो. आज रोजी भाव ५० ते ५५ रुपये किलो असुन निम्म्या किमतीत कोंबड्या विकल्या जात आहेत. ५००० पक्षांच्या फार्मचा हिशोब केल्यास २ लाख ५० हजार रुपयांची त्याला नुकसान होत आहे. असेच नुकसान लेयर फार्म यांच्याबाबतीत असून त्यांना एक अंडया मागे एक रुपयाचे नुकसान होत आहे जसे ५००० पक्षांच्या फार्मला पाच हजार रुपये प्रति दिवस नुकसान होत
असून गेल्या पस्तीस दिवसांपासून तो नकसान सहन करत असुन पुढेही ते किती दिवस चाल राहील हे सांगता येत नाही.तरी शासनाने याची दखल घेऊन योग्य ती नुकसान भरपाई दयावी ही कळकळीची विनती तसेच आमची दखल शासन दरबारी घेण्यात यावी कारण यामुळे हजारो शेतकरी बेरोजगार झालेले आहेत. तसेच या व्यवसायावर अवलंबुन असलेले मका व सोयाबीनचे शेतकरी सुध्दा अडचणीत सापडलेले आहेत. तरी पोल्ट्री व्यवसायाची नुकसानभरपाई शासनाने तात्काळ मंजूर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button