खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेर रोटरी क्लब व आरसीसी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने १५० रुग्णांचे डोळे तर ११५ बालकांची आरोग्य तपासणी

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर रोटरी क्लब व आरसीसी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.८ मार्च रोजी मोफत डोळे तपासणी शिबिर व बालरोग तपासणी शिबीर झाले. या शिबिरास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. १५० रुग्णांचे डोळे तर ११५ बालकांची तपासणी करण्यात आली.
शिबिरात १५० रुग्णांचे डोळे तपासण्यात आलेत. त्यापैकी २३ रुग्णाची डोळ्याची शस्त्रक्रिया गणेश हाऊसस्पिटल अमळनेर येथे नेत्ररोग तज्ञ डॉ. राहुल मुठे करणार आहेत  तसेच ११५ बालकांची तपासणी बालरोगतज्ज्ञ डॉ शरद बाविस्कर यांनी केली व बालरुग्नाना मोफत औषधे व गोळ्या वाटप करण्यात आल्या .
या कार्यक्रमासाठी अमळनेर रोटरी क्लब प्रेसिडेंट रो.पुनम कोचर,रोटरी सेक्रेटरी रो. वृषभ पारख रो. रोहित सिंगवी, रो.नेत्ररोग तज्ञ डॉ. राहुल मुठे, बालरोगतज्ज्ञ डॉ. शरद बाविस्कर, रो.अरविंद मुठे ,रो. महेश पाटील ,रो. अभिजित भांडारकर, रो. सुहास राणे, रो. विनोद जैन , रो. विनायक पिंपरी कर, रो. दिलीप भावसार, रो. प्रतिक जैन, रो. योगेश येवले. तसेच गडखांब आरसीसी क्लब अध्यक्ष रमेश व्यंकट पाटील ,सचिव योगेश महाले, शामकांत पाटील, मगन आधार पाटील, प्रकाश बोधरे, देविदास पाटील, बाळू पाटील उपस्थितीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button