खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
महत्वाचे

अमळनेर मतदार संघात 24 कोटींचे रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळाल्याने रस्ते होणार चकाचक

आमदार अनिल पाटील यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये मंजुरी

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर मतदार संघात 24 कोटींचे रस्त्याच्या कामांना अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये मंजुरी मिळाली आहे. मंजुरी मिळाली आहे. आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या माध्यमातून या कामांना मंजुरी मिळाली असून मतदार संघातील रस्ते चकचकीत होणार आहेत.
या कामांमध्ये प्रमुख जिल्हा मार्ग, राज्य मार्ग या मार्गाच्या कामाची मंजुरी या अर्थसंकल्पात मंजूर झाले आहेत. त्यामुळे खराब रस्ते दर्जेदार होतील व रस्त्यांवरील वाहतूक सुरळीतपणे चालू होईल. खराब रस्त्यांमुळे नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. रस्ते खड्डेमय झाल्याने खड्डे चुकवीत असतांना अपघात होतात. यामुळे वाहनचालकांना मोठा फटका बसतो. यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद झाल्याने लवकर कामे सुरू होतील. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी सतत पाठपुरावा केल्याने कामांना मंजुरी मिळाली आहे.

अमळनेर मतदार संघात मंजूर झालेले रस्ते

धरणगाव – राजवड – पारोळा – कजगाव रस्ता रामा क्र 39 किमी 8 / 200 10/ 500 याची सुधारणा करणे तालुका पारोळा रुपये 1 कोटी 50 लाख. शहादा सांगवी हातेड अमळनेर पारोळा भडगाव रस्ता रामा क्र 01 183 / 160 ते 198 / 360 रुपये अडीच कोटी. पाळधी- धरणगाव – अमळनेर – शिंदखेडा रस्ता राज्य महामार्ग क्रमांक 06 किमी 44 / 800 ते 46 / 00, 47/300 ते 48 / 300 किमी 55 /200 ची सुधारणा करणे ता अमळनेर रुपये दीड कोटी. शहादा – सांगवी – हातेड – जळोद – अमळनेर रस्ता राज्यमार्ग क्रमांक 1 किमी 164/300 मध्ये पुलाचे रुंदीकरण करणे ता अमळनेर रुपये दीड कोटी. भोलाने- बहादरपुर- भिलाली- रत्नपिंप्री- शेळावे रस्‍ता प्रजिमा क्र 48 किमी 15/500 मध्ये बोरी नदीवर पुलाच्या ठिकाणी अर्ध बंधारा बांधणे ता. पारोळा रुपये दीड कोटी. एरंडोल- कल्याणी खुर्द – मठगव्हान – जळोद मांडळ रस्ता प्रजिमा क्र 52 15/500 किमी 35 / 600 ते 55 / 00 ची सुधारणा करणे ता अमळनेर रुपये 3 कोटी 50 लाख.वावडे – जवखेडा – जानवे- कावपिंप्री – पारोळा रस्ता प्रजिमा क्र 46 किमी 1 / 00 ते 6 / 00 ची सुधारणा करणे ता अमळनेर रुपये 2 कोटी. जांभोरा- ढेकू हेडावे – अमळनेर – ढेकू – शिरसाळे- तळवाडे – मंडळ रस्ता प्रजिमा क्र 51 किमी 10 / 500 व 15 / 200 मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे वळण रस्त्यांची अभियांत्रिकी सुधारणा करणे ता अमळनेर 3 कोटी. कलाली – निंभोरा- पिंगळवाडे प्रजिमा क्र 3 किमी 36/ 500 ते 421 / 500 ची सुधारणा करणे व निंभोरा गावजवळ संरक्षण भिंत उभी करणे ता अमळनेर रुपये 1 कोटी. जांभोरा- हेडावे – अमळनेर- ढेकू – शिरसाळे तरवाडे – मांडळ रस्ता प्रतिमा क्र 51 किमी 22 / 100 ते 23 / 200 व 41/ 00 ते 41 / 00 ते 41/, 600 ही सुधारणा करणे तालुका अमळनेर रुपये 1 कोटी 25 लाख.बोळे – मोंढाळे – बहादरपूर – अमळनेर रस्ता प्रजिमा क्र 449 किमी 21 / 800 ते 27 ची रुंदीकरणसह सुधारणा करणे रुपये 1 कोटी 50 लाख. लासुर – हिंगोणा -मठगव्हाण – पातोंडा – दहिवद- टाकरखेडा रस्ता प्रजिमा प्रजिमा क्र 5 किमी 35/ 500 आणि 36 /00 मध्ये लहान पुलाचे बांधकाम जोड रस्त्यासह करणे ता अमळनेर 1 कोटी रुपये 20 लाख. भोलाणे- बहादरपूर- रत्नापिंप्री – शेळावे रस्ता प्रजिमा क्र 48 किमी 8 / 00 ते 12 / 00 ची सुधारणा करणे ता पारोळा रुपये 2 लाख 50 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button