खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
राजकीय

जिल्हा दुध संघाच्या संचालक पदावर उदय वाघांची कन्या भैरवी वाघ यांची एकमुखाने निवड

अमळनेर(प्रतिनिधी) जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या संचालकपदी भैरवी वाघ (पलांडे) यांची संचालक मंडळाच्या बैठकीत संचालक पदावर एकमुखाने निवड करण्यात आली आहे. त्या उदय वाघ यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत. उदय वाघ यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर त्यांची निवड करण्यात आली आहे.
जळगाव जिल्हा सहकारी दुध संघाचे अमळनेर तालुक्याचे प्रतिनिधी तथा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अध्यक्ष उदय वाघ यांचे नोव्हेंबर महिन्यात निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या जेष्ठ कन्या भैरवी वाघ यांची निवड करण्यात यांवी अशी मागणी तालुक्यातील जेष्ठ नेते व कार्यकर्त्यांनी संचालक मंडळाकडे केली होती. त्यानुसार संचालक मंडळाच्या बैठकीत एकमुखाने भैरवी वाघ यांची संचालक पदावर निवड घोषित करण्यात आली आहे.भैरवी वाघ यांच्या निवडीचे स्वागत होत आहे.मिळालेल्या संधीचे सोने करून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी कार्यरत राहण्याचा मानस भैरवी वाघ हिने व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button