राष्ट्रीय ललित कला पुरस्कार 2020
???? राष्ट्रपती राम नाथ कोविंद ह्यांच्या हस्ते 4 मार्च 2020 रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित एका कार्यक्रमात 15 गुणवंत कलाकारांना 61वे ‘वार्षिक ललित कला अकादमी पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.
????स्वरूप
???? विजेत्यांना पुरस्कारस्वरूपात थाळी, शाल आणि एक लक्ष रुपये रोख बक्षीस देण्यात आले.
????पुरस्कार विजेते कलाकारांमध्ये-
???? १) अनुप कुमार मनझुखी गोपी, २) डेव्हिड मलाकार, ३) देवेंद्र कुमार खरे,४) दिनेश पंड्या, ५) फारुक अहमद हलदर, ६) हरी राम कुंभावत,७) केशरी नंदन प्रसाद, ८) मोहन कुमार टी.,९) रतन कृष्ण सहा, १०) सागर वसंत कांबळे,११) सतविंदर कौर, १२) सुनील थिरूवायूर, १३ )तेजस्वी नारायण सोनावणे, १४) यशपाल सिंग १५) यशवंत सिंग यांचा समावेश आहे.
???? या कलाकारांच्या कलाकृती 22 मार्च 2020 पर्यंत नवी दिल्लीत ललित कला अकादमीच्या कलादालनात 61 व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनीत ठेवण्यात आल्या आहेत.
????ललित कला अकादमी
???? ललित कला अकादमी याची स्थापना 5 ऑगस्ट 1954 रोजी एक स्वायत्त संस्था म्हणून करण्यात आली, ज्याला 1957 साली वैधानिक दर्जा दिला गेला.
???? ललित कला अकादमी दरवर्षी कलेला आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी कला प्रदर्शन आणि पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करते.
मुंबई इंडियन्सच्या किरॉन पोलार्डचा ट्वेंटी-20 वर्ल्ड रेकॉर्ड..
????वेस्ट इंडीज ट्वेंटी-20 संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा प्रमुख खेळाडू किरॉन पोलार्डने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला.
????ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणालाही न जमलेला पराक्रम त्यानं श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात नावावर केला.तर वेस्ट इंडिजनं या सामन्यात श्रीलंकेवर 25 धावांनी विजय मिळवून दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
????वेस्ट इंडिजच्या 4 बाद 196 धावांचा पाठलाग करतान श्रीलंकेचा संपूर्ण संघ 171 धावांवर तंबूत परतला.तसेच या सामन्यात पोलार्डनं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा पल्ला पार केला. पण, मैदानावर पाऊल टाकताच त्यानं नावावर केलेला विक्रम आतापर्यंत कोणालाही जमलेला नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
मुकेश अंबानी खरेदी करणार अनिल अंबानींची आरकॉम..
????देशातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी त्यांचे बंधू अनिल अंबानी यांची दिवाळखोरीत गेलेली रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) विकत घेणार आहेत.
????यासंदर्भातल्या आराखड्याला स्टेट बँक ऑफ इंडियानं मंजुरी दिली आहे. यामधून 23 हजार कोटी रुपये मिळतील, अशी आशा कर्जपुरवठा केलेल्या बँकांना आहे. स्टेट बँकेनं रिलायन्स कम्युनिकेशन्सला हजारो कोटींचं कर्ज दिलं होतं.
????तर मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओनं आरकॉमचे टॉवर आणि फायबर बिझनेस (रिलायन्स इंफ्राटेल) खरेदी करण्यासाठी 4700 कोटी रुपयांची ऑफर दिली. यूव्ही असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीनं (UVARC) आरकॉम आणि रिलायन्स टेलिकॉमच्या मालमत्तेसाठी 14700 कोटींची बोली लावली.
????आरकॉमला भारतीय आणि चीनमधील देणेकऱ्यांचे 4300 कोटी रुपये प्राधान्यानं द्यायचे आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बोर्डनं आरकॉमच्या ठराव योजनेला मंजुरी दिली आहे. यासंदर्भात देणेकरांच्या बैठकीचा आज शेवटचा दिवस आहे. आरकॉमवरील सुरक्षित कर्जाची रक्कम 33 हजार कोटींच्या घरात आहे. तर देणेकऱ्यांचा दावा 49 हजार कोटींचा आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
16 व्या वर्षी शफाली नंबर वन..
????टीम इंडियाची युवा धडाकेबाज फलंदाज शफाली वर्मा हिने जागतिक टी 20 फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.ICC ने महिला टी 20 क्रिकेटपटूंची ताजी यादी जाहीर केली. यात शफाली तब्बल 19 स्थानांची झेप घेत पहिल्या स्थानी विराजमान झाली आहे.
????तसेच तिने न्यूझीलंडची अनुभवी खेळाडू सुझी बेट्स हिला मागे टाकले. सुझी बेट्स हिची एका स्थानाने घसरण होऊन ती दुसऱ्या स्थानी घसरली आहे. सुझीचे 750 गुणांक आहेत, तर शफाली 761 गुणांकासह अव्वल आहे.तर ऑक्टोबर 2018 पासून सुझी अव्वल स्थानी होती. अखेर 17 महिन्यांनी तिला दुसऱ्या स्थानी ढकलत शफालीने अव्वल स्थान पटकावले.
????टी 20 विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहोचणारा भारत पहिला संघ ठरला होता. त्यात शफालीचे महत्त्वाचे योगदान होते. प्रत्येक सामन्यात शफालीने धडाकेबाज कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला.
????शफालीने भारताला दमदार कामगिरी करून देत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. यासह महिला आणि पुरूष अशा दोन्ही क्रिकेटमध्ये मिळून टी 20 जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारी शफाली सर्वात तरूण भारतीय क्रिकेटपटू ठरली.
????याशिवाय भारतीय संघाची माजी कर्णधार मिताली राज हिच्यानंतर टी 20 क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारी ती दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सर्वोच्च न्यायालयाने उठवली क्रिप्टोकरन्सीच्या ट्रेडिंगवरील बंदी
????सर्वोच्च न्यायालयाने आभासी चलनाच्या (क्रिप्टोकरन्सी) वापरावर लावण्यात आलेली बंदी उठवली असून व्यवहारात वापर करण्यासाठी परवानगी दिली आहे.
????रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) एप्रिल 2018 मध्ये बिटकॉइनसारख्या आभासी चलनाच्या ट्रेडिंगवर बंदी आणली होती.
????आरबीआयने बिटकॉइन तसंच इतर आभासी चलनांसंबधी नियम अत्यंत कठीण केले होते. यावेळी त्यांनी बँक आणि इतर आर्थिक संस्थांना कोणत्याही सेवा देण्यापासून बंदी आणली होती.
????तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवण्याचा निर्णय दिला. यावेळी न्यायालयाने आरबीआय अशा प्रकारची बंदी आणू शकत नाही असं सांगितलं.
????तर आरबीआयने आपल्या आदेशात सांगितलं होतं की, कोणत्याही आर्थिक संस्थेने क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करु नये. यासोबतच आरबीआयने सामान्य नागरिकांना क्रिप्टोकरन्सीवर ट्रेडिंग केल्यानंतर होणाऱ्या नुकसानासाठी स्वत: जबाबदार असतील असा इशारा दिला होता.
????2018 मध्ये आभासी चलन बिटकॉइनचं महत्व आणि किंमत वाढत होती. अनेकांनी बिटकॉइनच्या सहाय्याने मोठी कमाई करत नफा मिळवला होता.
????बिटकॉइनचा वाढता वापर लक्षात घेता आरबीआयने त्याला चलन म्हणून मान्यता देण्यास नकार दिला होता. सोबतच बिटकॉइनमध्ये ट्रेडिंगमुळे होणाऱ्या नुकसानासाठी आरबीआय जबाबदार राहणार नाही असंही स्पष्ट केलं होतं.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖