खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
महत्वाचे

मालपूर, आमोदे, तासखेडा विकास सोसायटी चेरमनपदी उदय पाटील तर व्हॉईस चेरमनपदी सगुणाबाई पाटील यांची बिनविरोध निवड

कळमसरे (गजानन पाटील) तालुक्यातील मालपूर, आमोदे, तासखेडा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची पंचवार्षिक  निवडणूक बिनविरोध पार पडली. मालपूर येथील उदय गणेश पवार यांची चेरमनपदी तर सगुणाबाई विनायक पाटील यांची व्हॉइस चेरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
यात संचालक म्हणून हिंमतराव पाटील, शांताराम पाटील, संभाजी पाटील, रावण पाटील,प्रकाश पाटील, संजय पाटील, हिंमतराव अर्जुन पाटील,विजयाबाई पवार,समाधान धनगर,निर्मलाबाई पाटील यांची निवड करण्यात आली.याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एच. व्ही. कासोदेकर व सचिव भावसार यांनी काम पाहिले.बिनविरोध निवडप्रसंगी बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल पवार,माजी सरपंच मुरलीधर पाटील,प्रा.गणेश पवार,मनोहर पवार,व्ही.टी. पाटील,पुंडलीक पाटील जिजाबराव पाटील,अमृत पाटील आदींनी सहकार्य केले.यावेळी सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचे पदाधिकारी यांचा सत्कार प्रफुल्ल पवार यांनी केला.त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र स्वागत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button