खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
महत्वाचे

कृतिशील आणि ज्ञानरचनावादी अध्ययनाने विद्यार्थ्यांना अवघड गणिताची लागली गोडी    

साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात शिक्षक डी. ए. धनगर यांचा उपक्रम

   अमळनेर (प्रतिनिधी) येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक डी. ए. धनगर यांनी अवघड वाटणाऱ्या गणित विषयात  ज्ञानरचनावादी पध्दतीने क्षेत्रफळ , पृष्ठफळ व घनफळ ही संकल्पना सुत्र न वापरता ती विद्यार्थ्यांना समजावून दिली. त्यमुळे आपल्या कृतियुक्त आनंददायी अध्यापनाची विद्यार्थ्यांना अनुभूती आल्याने विद्यार्थ्यांना गणिताच्या विषयात गोडी निर्माण होऊ लागली आहे, असे  शाळेचे मुख्याध्यापक एस. डी. देशमुख यांना समजावून सांगितले.
डी. ए. धनगर यांनीआपल्या कृतियुक्त व ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धतीने शाळेतील विद्यार्थ्यांना भुरळ घातली आहे. खरं तर गणितात अनेक सूत्र असतात ते विद्यार्थ्यांना कंटाळवाणे व नकोसे वाटतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गणित शिकण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणतात. परंतु यावर मात करून उपक्रमशील गणित शिक्षक धनगर यांनी ज्ञानरचनावादी, आनंददायी व दृष्य गणित शिकण्या-शिकवण्याचा मार्ग अवलंबल्याने मुले स्वःता गणित शिकण्याची धडपड करत आहेत. आधीच आपल्या सेल्फीच्या फंड्याने विद्यार्थ्यांना मोहीत करीत आनंद देत आहेत.
द्विमित आकृत्यांचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आकृती परत्वे अनेक सुत्र असतात. परंतु सुत्राचा वापर न करता द्विमित भौमितिक आकृत्यांचे क्षेत्रफळ काढण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांत निर्माण केल्याने विद्यार्थी सुत्र न वापरता क्षेत्रफळ काढत आहेत. व सुत्र वापरून त्याची पडताळणी करीत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा न्यूनगंड दूर सारून, आत्मविश्वास निर्माण होत आहे व वर्गातील  मूले अनेक उदाहरणे सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच त्रिमितीय भौमितिक आकृत्यांचे पृष्ठफळ व घनफळ काढण्याचे विशिष्ट तंत्र दिल्याने विद्यार्थ्यी स्वतः सुत्र निर्माण करून त्यांचे पृष्ठपळ व घनफळ काढण्याचे कार्य करीत आहेत. आपल्या गणित शिकवण्याच्या अनोख्या तंत्रज्ञाने विद्यार्थ्यांना मोहीत केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button