खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

गडखांब येथील वंचित शेतकऱ्यांना कर्ज माफी द्यावी अन्यथा शेतकऱ्यांना मरावे लागेल

अमळनेर तालुक्यातील शेतकरी संघटनाचा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून इशारा

अमळनेर (प्रतिनिधी) राज्य सरकारने शेतकऱ्याना कर्ज माफी जाहीर केली आहे. मात्र तालुक्यतील गडखांब येथील अनेक शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळालेली नाही. त्यामुळे वंचित शेतकऱ्यांना कर्ज माफी द्यावी अन्यथा शेतकऱ्यांना मरावे लागेल,  असा इशारा  शेतकरी संघटनांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
अमळनेर तालुक्यात २००८ पासून कर्ज माफीपासून वंचित राहिलेले अनेक मृत खातेदार गडखांब येथे आहेत.  त्यांच्या वारसांना जेलमध्ये घातलेल्या कैद्यांसारखी शिक्षा भोगावी लागत आहे. युती शासनाने आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी  जाहीर करूनही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. गडखांब येथील  वि का सोसायटीकडून कर्ज घेतलेले २०१३ पासून ३८ शेतकरी कर्जमाफी पासून वंचित  राहिले आहेत. याव्यतिरिक्त राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेतलेले अनेक शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे शासनाने खोटी आश्वासने बंद करावीत आणि कर्ज माफी द्यावी, अशी मागणी किसान सभेचे राष्ट्रीय प्रभारी शिवाजीराव पाटील , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवाजी दौलत पाटील , गावरानी जागल्या संघटनेचे विश्वास पाटील , रमेश पाटील , भरत  पाटील , प्रकाश पाटील , कैलास पाटील , ज्ञानेश्वर पाटील , हरचंद पाटील , मीराबाई पाटील , सुरेश पाटील , यशवंत पाटील , नाना पाटील , देवराम पाटील ,सुरेश पाटील दौलत बागुल आदींसह ३६ शेतकऱ्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button