खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

जैतपिर येथील माळण नदीमधे पोहण्यासाठी गेलेल्या एकाचा नदीतील गाळात रुतून मृत्यू

अमळनेर(प्रतिनिधी) तालुक्यातील जैतपिर येथील माळण नदीमधे पोहण्यासाठी गेलेल्या एकाचा नदीतील गाळात रुतून मृत्यू झाल्याची घटना सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी सकाळी घडली. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, धरम मंगा भिल (रा.जैतपिर) हे सोमवारी सकाळी ९:३० वाजता माळण नदीमधे नेहमी प्रमाणे पोहण्यासाठी गेले होते. नदीतील मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने ते गाळात अडकुन बुडुन मरण पावल्याने. त्याचा भाऊ आबा मंगा भिल, पोलीस पाटील गोविंद लोटन पाटील , इतर गावकऱ्यानी व त्याचे नातेवाईकाने त्याला गाळातुन बाहेर काढले.  याप्रकरणी अ.मृ.नं.१०/२० सीआरपीसी क.१७४ प्रमाणे दाखल केला असुन पुढील तपास सपोनि राहुल फुला, पोहेकाॅ साळुंखे, पोना अगोणे व पोना सचिन निकम हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button