खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
महत्वाचे

कपिलेश्वर महादेव मंदिरच्या यात्रोत्सवास महाशिवरात्रीपासून उत्साहात सुरुवात

परप्रांतीय भाविकांची दोन दिवसअगोदर नवस फेडून दर्शनासाठी केली गर्दी

कळमसरे (गजानन पाटील)  खान्देशातील पर्यटन आणि तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेले नीम (ता.अमळनेर) जवळील कपिलेश्वर महादेव मंदिरच्या यात्रोत्सवास महाशिवरात्रीला सुरुवात झाली. पंधरा दिवस हा यात्रोत्सव सुरू राहणार आहे. परप्रांतीय भाविकांची दोन दिवसअगोदर नवस फेडून दर्शनासाठी गर्दी केली होती.
जळगाव व धुळे जिल्ह्याच्या सीमारेषेवर असलेले एक हजार वर्षापूर्वीचा इतिहास लाभलेले श्री क्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिर हे खान्देशातच नव्हे तर भारतात अल्पवाधित  सर्वत्र परिचयास आलेले ह्या मंदिरावर राज्यातील काना कोपऱ्यातुन भाविकांची गर्दी होऊ लागल्याने परिसराला महत्त्व प्राप्त झाले आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूला तापी , पांझरा आणि गुप्तगंगा असलेल्या त्रिवेणी संगमावर सुमारे एक हजार वर्षांपूर्वी ऋषी कपिल मुनींनी तपस्या करीत शिवलिंगाची स्थापना केली आहे. या मंदिराचे महत्व स्कंदपुराणातही सांगितले गेले असून याच ठिकाणी मंदिराचे मठाधिपती हंसांनंदजी महाराज यांनी सन 2005 साली अखिल भारतीय संत संमेलन भरविले होते. यावेळी भारतातुन संतांनी हजेरी लावीत कळमसरेसह परिसरातील भूमी पावन झाली आहे.अध्यत्म आणि सामाजिकता यातून परिसरात कायापालट झाला असून मंदिराला लागूनच अनिरुद्ध बापूंचा आश्रम आहे. याठिकाणी दर शनिवारी व रविवारी मुंबई, पुणे ,नाशिकसह महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातुन भाविक येत असल्याने  या निसर्गाच्या सानिध्यात भाविकांची मांदियाळी नजरेस पडत आहे. याच ठिकाणी मठाधिपती हंसांनंद महाराज यांनी लहान बालकांसाठी वेधशाळा सुरू केली असून शालेय शिक्षणाबरोबर त्यांना अध्यात्म न्यान दिले जात आहे. मंदिरावर वर्षभर धार्मिक, सामाजिक कार्यक्रम सुरू असतात.तर महाशिवरात्रीला मोठा यात्रोत्सव भरविला जातो.

अमळनेर आगाराने भाविकांना जाण्यासाठी जादा एस टी बसेसची केली सुविधा

        मंदिरात तीन शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. या जागृत देवस्थानच्या दर्शनासाठी वर्षभर भाविक येत असतात. अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचे बांधकाम केले आहे. दरम्यान यात्रोत्सवासाठी पाळणा,उपहारगृहे,संसार उपयोगी वस्तू, खेळण्याची दुकाने थाटली असून अमळनेर आगाराने भाविकांना जाण्यासाठी जादा एस टी बसेसची सोय केली असून मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल फुला ,व त्यांचे पोलीस कर्मचारी यांचा बंदोबस्त राहणार असून मंदिरावर दाळ बट्टीचा नैवदय ,नवस फेडण्यासाठी भाविक दाखल झाले आहेत.

श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिराला तीर्थस्थळ आणि पर्यटन स्थळाचा नुसताच गाजावाजा

     श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिराला तीर्थस्थळ व पर्यटनस्थळचा दर्जा  मिळाला असल्याचा गाजावाजा आजही निःसंकोचपणे केला जातो खरा मात्र,मंदिराची जागा आजतागायत नावे नसल्याने शासनाच्या मिळणाऱ्या निधी पासून या तीर्थक्षेत्रास वंचित राहावे लागत आहे.परिणामी  हंसानद महाराज व मंदिराचे विश्वस्त जळगाव धुळे जिल्ह्यात झोळी फिरवित बरीच विकासकामे केली आहेत.तर सद्यस्थितित लोकवर्गनीतुन भक्त निवासाचे काम सुरु आहे. खान्देशातील प्रशिद्ध असलेले या मंदिराची महती सर्वदूर असल्याने दर्शनासाठी गर्दी होऊ लागली आहे.सुलवाडे बैरेजच्या बॅक वॉटरमुळे मंदिराच्या तापी व पांझरा नदित दोन्ही बाजूस पाणी असल्यामुळे यात्रोउत्सव दोन्ही काठावर भरविली जाते. खेळण्याची दुकाने, उपहार गृहे ,संसार उपयोगी वस्तु आदी दुकाने थाटली आहे. महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन हंसानद महाराज व मंदिराचे विश्वस्त यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button