अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील नर्मदा वाडीजवळ व्यापऱ्यावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणी एलसीबी पथकाने एका संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
अमळनेर शहरातील नर्मदा वाडीजवळ ३ फेब्रुवारी रोजी रात्री बसंतराय तेजुमल बितराई व अजय यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गावठी पिस्तूलने गोळीबार केला होता. सुदैवाने गोळी भिंतीला लागली. त्यामुळे अनर्थ टळला. या घटनेमुळे संपूर्ण अमळनेर शहर हादरले होते याप्रकरणी एलसीबी पथकाने एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर दुसर्या आरोपीला ही लवकरच जेरबंद करू असा विश्वास पथकाने व्यक्त केला आहे.