अमळनेर (प्रतिनिधी)लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या वतीने शनिवारी 8 रोजी होणाऱ्या सभेत वादग्रस्त वक्ते उपस्थितीत राहणार असल्याने शहरातील वातावरण संवेदनशील झाले आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. तर अप्पर पोलिस अधीक्षक ही अमळनेरात तळ ठोकून आहेत.
लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या वतीने सभेला संबोधित करण्यासाठी राष्ट्रीय वक्ते योगेंद्र यादव, आ.जिग्नेश मेवानी,भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी नेते उमर खालिद उपस्थित राहणार आहेत. या सभेला हिंदू संघटनांकडून विरोध होत आहे. तर आयोजक सभा घेण्यावर ठाम आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर तेढ निर्माण करणार्या पोस्ट, लिखाण होऊन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी आपली करडी नजर ठेवली आहे.