अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी विविध प्रभाभागातील खुल्या भूखंडावर उगवलेले झाडी झुडपे जेसीबीने काढून टाकण्याचे काम नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व माजी आमदार साहेबराव पाटील यांनी स्वखर्चाने करणे सुरू केले आहे. याचे नागरिकांनी स्वागत आहे.
व्यावसायिक प्लॉट दलालांनी शहरात घाण केली आहे. त्यांचे रिकामे प्लॉट घाणीचे अड्डे झाले होते. नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले ही बाब पाहत साफसफाई सुरू कसली आहे.यंदा जास्त पावसाने पावसाळ्यात तर गवत झाडाझुडूपांनी जंगलच तयार झाले होते. यामुळे अमळनेरच्या विद्रुपीकरणात भर घालत होते.
अमळनेर शहरात मोठ्या प्रमाणावर मोकळे व असंख्य रिकाम्या जागांचे प्लॉट पडले आहेत. यात साचणारे प्राणी, सरपटणारे प्राणी, असंख्य कीटक, यांचा वावर वाढतो. त्यामुळे नागरीकांचे राहणे मुश्कील होते. नव्या वसाहतींमध्ये ही वाढलेली झाडे झुडूपे नागरीकांना प्रचंड तापदायक ठरली होती. त्यामुळे हे प्लॉटधारक पालिकेला डोकेदुखीचे ठरले होते. अनेकांनी एकापेक्षा अधिक प्लॉट घेऊन ठेवले आहेत मात्र त्यांनीही गावात राहून आपल्या जागांची साफसफाई केलेली नव्हती. त्यामुळे नगरपालिकेने हे काम हाती घेतले आहे.
या परीसरात करण्यात आली साफसफाई
प्रत्येक गेल्या दोन दिवसांपासून वैयक्तिकरित्या दोन जेसीबीच्या साहाय्याने भाड्याने लावत काम सुरू केले आहे. ते रोज जेसीबी घेऊन एका प्रभागात जातात. त्यात आतापर्यंत त्यांनी ढेकूरोड व पिंपळे रोडवर साफसफाई सुरू केली आहे. पिंपळे नाला यापासून ढेकू रोड पोलीस ठाण्यापर्यंत साफ करणे सुरु आहे. याठिकाणी गटारीच्या बाजूला असलेली, रस्त्यावरील रस्त्याच्या साईडपट्ट्या लगत असलेली उंच काटेरी झुडुपे खुल्या भूखंडावर उगवलेले काटेरी बाभळी अशी साफसफाई सुरु आहे. त्या भागातील कामाची स्वतः माजी आमदार साहेबराव पाटील हे पाहणी करत आहेत.
स्वच्छता न करणार्या खुल्या भूखंडावर पालिकेने दंडात्मक कारवाई करावी
स्वच्छता न करणार्या खुल्या भूखंडावर पालिकेने दंडात्मक कारवाई करुन साफसफाईची कर वसूली करणे जनतेला अपेक्षित आहे. यामुळे व्यावसायिकता जोपासणारे आपल्या जागा स्वत: साफ करुन घेत नाही म्हणून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिकांची आहे.