अमळनेर ( प्रतिनिधी ) अमळनेर येथील मुस्लिम बागवान समाजाच्या झालेल्या सामूहीक निकाहमध्ये चार जोडप्यांचा निकाह लावण्यात आला. या वेळी समाजबांधव आणि निकाह करणाऱ्यांचे नातेवाइक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अमळनेर येथील बागवान समाजातर्फे २१ वा सामूहिक निकाह शहरातील इंदिरा गांधी भवन येथे आयोजित करण्यात आला होता. यात मुस्लिम बागवान समाजाच्या चार मुंलीचे निकाह लावण्यात आले. अब्बासिया मस्जिदचे मौलना यांनी निकह ए कुतबा व निकहची प्रकिया केली. अरबिना बी, नौशिन बी, अरबीना बानो, फिरदौस नाज या मुलींच्या मो. वसीम, मो. अवैस, मो. अनिस, मो. तन्वीर या मुलांशी निकाह झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सलीम बाबुलाल बागवान, नुरा बागवान, गुलाम रसुल बागवान, हुसैन बागवान, हाशिम बागवान, राज मोहम्मद बागवान, रहिम बागवान, राजू बागवान, असलम बागवानसह सर्व वरिष्ठ व युवकांनी परिश्रम घेतले.