अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेरला ८ फेब्रुवारी रोजी लोकशाही बचाव नागगरिक कृती समितीच्या होणाऱ्या जाहीर सभेत उमर खालीद उपस्थित राहणार आहे. त्यांच्यावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. त्यामुळे अमळनेर शहरातील कायदा व सुव्यवस्ता बिघडून नये म्हणून त्यांच्या सभेला परवानगी देऊन नये, अशी मागणी अमळनेर तालुका भाजपा आणि विश्ववहिंदू परिषदेचे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
लोकशाही बचाव नागरिक कृती समितीतर्फे दिनांक ८ फेब्रुवारी २०२० सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह लोकशाही जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या जाहीर सभेला उमर खालिद या नेत्याला प्रमुख वक्ता म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे, उपसभापती श्याम अहिरे, माजी जि. प. सदस्य व्ही. आर .पाटील, शीतल देशमुख, राकेश पाटील, नाटेश्वर पाटील, बबलू राजपूत,पंकज मोरे,योगीराज चव्हाण,कल्पेश पाटील,दीपक पाटील,विश्ववहिंदू परिषदेचे सुरेश पवार,संजय विसपुते,आशिष दुसाने,सचिन चौधरी,किरण बोरसे,सूरज परदेशी,सूरज गोत्राल,गणेश मोरे,अनिल बडगुजर,बाळा पवार,भूषण पाटील,योगेश जाधव,दीपक पाटील,झुलाल पाटील,राजेश वाघ यांनी केली आहे.