खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून अनोरे गावाची सेमीफाईनल फेरीत निवड

केंद्रीय भुजल मंत्रालयाच्या जलशक्ती अभियानाच्या वैज्ञानिक पथकाने केली गावाची पाहणी

अमळनेर (प्रतिनिधी)राष्ट्रीय जल पुरस्कारसाठी महाराष्टातुन अनोरे गावाची सेमीफाईनल फेरीत निवङ झाली आहे. यासाठी केंद्रीय भुजल मंत्रालयाच्या जलशक्ती अभियानाच्या वैज्ञानिक श्रीमती अधिरा यांच्या पथकाने बुधवारी गावाची पाहणी केली.  यावेळी  ग्रामसभा झाली. “गावकऱ्यांनी थेंब थेंब जिरवून निर्माण केलेली जलशक्ती हिच खरी समृद्धी आहे!” असे प्रतिपादन भूजल वैज्ञानिक श्रीमती अधिरा यांनी  केले.
महाराष्ट्रातून केवळ दोनच गावाची निवड केंद्रीय पातळीवरील जलशक्ती पुरस्कार स्पर्धेत झालेली आहे. त्यात अमळनेर तालुक्यातील अनोरे आणि वाशिम जिल्ह्यातील बोरवा  बु!! हे गांव ही आहे.  वेळी खास ग्रामसभा व स्वागत कार्यक्रम झाला.  याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी दादाराव जाधवर,स्व.नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना प्रमुख संजय पवार यांनी जलसमृद्धीतून ग्राम समृद्धी कडे अनोरेची होणारी वाटचाल कौतुकास्पद आहे असे सांगितले.कार्यक्रमासाठी जिल्हा कृषी आधिकारी संभाजी ठाकुर, तालुका कुषी आधिकारी वारे, यांनी अनोरे गावासाठी कृषी विभागातुन सर्व सहकार्य नेहमीच असेल असे आपल्या मार्गदर्शनातून सांगीतले.यावेळी गावातील जेष्ठ कार्यकर्ते तुकाराम पाटील,जलशक्ती जळगावचे आकाश , ग्रामसेवक शशिकांत पाटील,तलाठी कुळकर्णी कृषी सहाय्यक लांङगे , दत्ताभाऊ पेंटर सायगव्हाण हे व्यासपीठावर उपस्थित होते.
जलमित्र संदीप पाटील जवखेङा, यांनी गावाने केलेली कामे व लेखाजोखा विस्तृत स्वरूपात आपल्या प्रास्ताविक भाषणात मांडला. तर सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी ‘अनोरे गावात जनशक्ती व जलशक्तीचा अपूर्व संगम झाला असल्याचे सांगितले. बाजीराव पाटील यांनी पांझरानदी जोङ प्रकल्पासाठी श्रीमती अधिरा यांनी केंद्रीय जल मंत्रालय दिल्ली येथुन सहकार्य करावे या मागणीचे लेखी निवेदन ही दिले.तुकाराम पाटील यांनी आभार मानले व असेच काम आगामी काळात अनोरे गाव सातत्य ठेवेल असे सांगितले.
अनोरे गावाने मागीलवर्षी पाणी फाउंडेशन स्पर्धेच्या माध्यमातुन मनसंधारणातुन जल संधारण व मृदसंधारण करत घरातील सांङपाणी तसेच पावसाचे शेतशिवाराचे व छतावरील पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी फाऊंडेशनचे राज्याचे तिसरे क्रमांकाचे बक्षीस उत्तरमहाराष्टाला मिळवुन दिले. त्या केलेल्या कामाच्या माध्यमातुन राष्टीय पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर केला होता. आज गावात झालेल्या कामाची पहाणी करण्यासाठी खास केंद्रीय भूजल मंत्रालयाचे जलशक्ती अभियानाचे पथक अनोरे गाव व परिसरातील झालेल्या कामाची शेतात व गावात प्रत्यक्ष पाहाणी केली.सदर पुरस्काराच्या प्रस्तावासाठी खंङागरे व खुशाल पाटील यांनी अतोनात परिश्रम घेतले.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी संपुर्ण ग्रामस्थ महिला, तरूण व बालगोपाल यांनी परिश्रम घेतले.

समीतीचे बैलगाङीवर मिरवणूक ‌काढून ग्रामस्थांनी केले स्वागत

साहेबराव महाराज व भजनी मंङळ यांनी भजनातुन तर आलेल्या समीतीचे बैलगाङीवर मिरवणूक काढून ग्रामस्थांनी स्वागत केले. सौभाग्यवतींनी औक्षण केले. तर गावातील विद्यार्थ्यांनी स्वागत गित सादर केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button