खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

बियाण्यांची मार्केटिंग करणार्‍याची मोटरसायकल गांधलीपुरा पुलाजवळ अडवून दोन चोरट्यांनी लुटले

खिशातून ५ हजार रुपये व ५ हजार रुपयाचा मोबाईल काढून केला पोबारा

अमळनेर (प्रतिनिधी) बियाण्यांची मार्केटिंग करणार्‍या पारोळा तालुक्यातील मोंढाळे पिंपरी येथील एकाची मोटरसायकल अडवून दोन अज्ञात चोरट्यांनी ५ हजार रुपये व एक मोबाईल  लुबाडल्याची घटना रविवारी २ रोजी सायंकाळी ६ वाजता गांधलीपुरा पुलाजवळ घडली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुकुंदा चिंधा बाविस्कर हे अमळनेर, पारोळा येथे नाथ सिड्स औरंगाबाद बियाण्यांची मार्केटिंग करायला येत असतात. ते आपली मोटरसायकलने (क्रमांक जीजे- १९, एके- ५३२०) अमळनेरहून गांधलीपुरा चौकीसमोरून नवीन पुलावरून जात असताना पुलाच्या पूर्व दिशेला दोन अज्ञात इस्मानी त्याला अडवून एकाने चाकू काढला आणि दुसर्‍याने शर्टाची कॉलर पकडली. तसेच शिवीगाळ करून मारहाण केली. त्याच्या खिशातून ५ हजार रुपये व ५ हजार रुपयाचा मोबाईल काढून घेतला. मुकुंद बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून  तपास हेडकॉन्स्टेबल पुरुषोत्तम पाटील करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button