खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

संमेलनाच्या वेळी झालेला वाद  सोडवायला गेलेल्या तरुणासह तिघांना बेदम मारहाण

लोखंडी सळईचा वापर करून पोटावर,छातीवर व खांद्यावर केले वार, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) येथील जय योगेश्वर विद्यालयात सुरू असलेल्या संमेलनाच्या वेळी झालेला वाद  सोडवायला गेलेल्या तरुणासह तिघांना चौघांनी बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. यात लोखंडी सळईचा वापर करण्यात आला. याप्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विशाल राजू जाधव (वय २० )रा.एलआयसी कॉलनी अमळनेर याने अमळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ३१ रोजी जय योगेश्वर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन सुरू असतांना भैय्या जगन सोनवणे, गणेश बैसाणे, दिनेश रमेश सोनवणे व राजू तडवी यांची शाब्दिक बोलाबोल करून भांडण सुरू असताना मी ते सोडवले.परंतु त्याचा ह्या चारही जणांना राग आल्याने ते सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास माझ्या घरासमोर दारूच्या नशेत येऊन त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली. मी आरडाओरड केली असता शुभम पाटील,राकेश साळुंखे हे मला वाचवायला आले असता राजू तडवी याने त्याच्या हातात असलेल्या लोखंडी वस्तूने शुभम पाटील च्या डोक्यावर मारून त्यास दुखापत केली.तसेच भैया जगन सोनवणे याने हातातील लोखंडी सळइने राकेश साळुंखे यांच्या पोटावर,छातीवर व खांद्यावर वार करून त्यासही जखमी केले. तसेच चौघांनी मिळून आम्हा तिघांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.विशाल जाधव याने दिलेल्या फिर्यादी वरून अमळनेर पोलिसात भादवी कलम ३२४,३२३, ५०४,५०६, ५९०,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सुनील हटकर करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button