खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेर नगरपालिकेला दिव्यांगांसाठी राखीव  ५% निधी  मार्च अखेर खर्च करण्याचे आदेश

राज्य मंत्री बच्चू कडू यांच्या दणक्याने नगरपालिकेची यंत्रणा  लागली कामाला

अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर नगरपरिषदेत दिव्यांगांसाठी राखीव असलेला ५% निधी  मार्च अखेर खर्च करण्याचे आदेश राज्य मंत्री बच्चू  कडू यांनी दिले आहेत. यामुळे अमळनेर नगरपालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे.
अमळनेर नगरपरिषदेत दिव्यांगांसाठी राखीव असलेला ५% निधी तात्काळ खर्च व्हावा यासाठी प्रहार अपंग क्रांतीच्या वतीने निवेदन देण्यात आले.या अगोदर प्रहार अपंग क्रांतीचे शहराध्यक्ष योगेश पवार आपल्या अपंग बांधवांसह  दि.२१ जानेवारी २०२० रोजी मुंबई येथे.राज्य मंत्री बच्चू  कडू यांची भेट घेतली. या भेटी प्रसंगी अमळनेर नागरपरिषदेतील ५% निधी खर्च पडत नसल्याचे व या संदर्भात निवेदन देणार असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर तात्काळ मा.ना.बच्चूकडू यांनी अमळनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी  शोभा बाविस्कर यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून दिव्यांग निधी मार्च अखेरपर्यंत खर्च व्हावा, असे आदेश देण्यात आले. अन्यथा आपल्यावर सेवा हमी कायद्यानुसार प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल असे स्पष्ट केले.या पार्श्वभूमीवर दि.२३ जानेवारी २०२० रोजी नागरपरिषदेचे उप-मुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्या दालनात बैठक आयोजित करून दिव्यांग निधी संदर्भात चर्चा करण्यात आली.तसेच ना.बच्चूकडू यांनी समंत केलेले निवेदन देतांना प्रहार अपंग क्रांती शहराध्यक्ष योगेश पवार , उपाध्यक्ष नूरखा पठाण , सामाजिक कार्यकर्त्या जयश्रीताई साळुंखे , मधुकर पाटील, शिवाजी शिंदे, आनंदा पाटील, अक्षय कदम, रामदास पाटील तसेच प्रहार सैनिक उपस्थितीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button