खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

न्यू व्हीजन स्कूल येथे दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त रंगले स्नेहसंमेलन

अमळनेर (प्रतिनिधी) न्यू व्हीजन स्कूल येथे दशकपूर्ती सोहळ्यानिमित्ताने वार्षिक स्नेहसंमेलन झाले. आमदार स्मिताताई उदय वाघ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व हवेत बलून सोडून उद्घाटन करण्यात आले.
या वेळी आमदार अनिल पाटील यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील होते. तसेच हिरालाल पाटील, उमेश वाल्हे, नाटेश्वर पाटील, डी. ए. धनगर , मनोज बोरसे, राजेंद्र पोतदार, न्यु व्हिजन स्कूलचे संस्थाध्यक्ष शीतल देशमुख, चेअरमन नीलेश लांडगे, उपाध्यक्ष धनराज महाजन, सचिव गोकुळ पाटील, मुख्याध्यापक संदीप महाजन, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक सॅम शिंगाने,  राजश्री चौधरी, दीपाली राजपूत, अनिल माळी,  कविता शिसोदे, प्रियंका सोनवणे, भाग्यश्री पदमे, नम्रता बडगुजर,चित्रा बडगुजर, विद्या पाटील, प्रियांका सोनवणे, दीपाली पाटील, नीता जाधव, शितल निकम,  हेमांगी काळकर, विद्या महाले,फरीन शेख, कामिनी महाजन ,वंदना मराठे, रितिका मार्कंडेय, मयुरी पाटील, सुचेता शिरसाठ,  पूजा महाजन, कल्पना कोराणी,योगिनी ओवे सर्व शिक्षक व तसेच शिक्षकेतर  कर्मचारी अनिता पाटील वंदना सोनार, माधुरी बाळापुरे, माधुरी सोनार, प्रतिभा पाटील, दिपाली पाटील, पंढरीनाथ बाबा यांचे सहकार्य लाभले . स्नेहा एकतारे, सुरभी सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. किरण सोनार यांनी आभार मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button