खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

प्रताप महाविद्यालयाच्या खान्देश विशेष’ ‘प्रतापीय’ नियतकालिक अंकाला पाच पारितोषिके जाहीर

अमळनेर (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन नियतकालीक अंक २०१८ -१९ च्या स्पर्धेत प्रताप  महाविद्यालयाच्या ‘खानदेश विशेष’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित ‘प्रतापीय’ या नियतकालिकाला विविध गटातील पाच पारितोषिके जाहीर झाली आहेत.गुणवंत विद्यार्थ्यांचे व संपादक मंडळाचे अभिनंदन केले.

गुणवंत विद्यार्थ्यांचे व संपादक मंडळाचे कौतुक होत आहे.

     या नियतकालिकाला उत्कृष्ट मांडणीसाठी द्वितीय क्रमांकाचे बक्षीस, हिंदी भाषेतील काव्य प्रकारातील तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पूजा रमेश पंजवानी(बी.ए.तृतीय वर्ष) तसेच इंग्रजी भाषेतील काव्य प्रकारात तृतीय पारितोषिक प्रगती संजय पाटील (बी.ए.तृतीय वर्ष) या विद्यार्थिनींना जाहीर झाले आहे. त्याचप्रमाणे मराठी भाषेतील संशोधनपर लेखन या प्रकारात द्वितीय पारितोषिक मिनाबाई देवाजी सैंदाणे (एम.ए.द्वितीय वर्ष मराठी) तर हिंदी भाषेतील संशोधनपर लेखन या प्रकारात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रियंका दगडू पाटील (बी.ए. द्वितीय वर्ष) हिला जाहीर झाले आहेत.अशी एकूण पाच पारितोषिके जाहीर झाले आहेत. सदर स्पर्धेमध्ये एकूण पन्नास महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला होता. यात प्रताप महाविद्यालयाने विविध प्रकारात दैदिप्यमान यश संपादित केले आहे. प्रतापीय या नियतकालिकाचा हा ७४ वा अंक ‘खानदेश विशेष’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित होता.
या यशाबद्दल खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष कार्योपाध्यक्ष व इतर पदाधिकारी तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. ज्योती राणे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे व संपादक मंडळाचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button