अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यात चोरट्यांनी आता पशुधन चोरीकडे मोर्चा वळवला आहे. ढेकू खुर्द येथून शेतकऱ्याचे ६७ हजार रुपयांचे दोन बैल चोरून नेल्याची घटना २० रोजी रात्री घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, वासुदेव छगन पाटील यांनी आपली बैलगाडी गावाच्या बाहेर खळ्यात बांधली होती. अज्ञात चोरट्याने २० रोजी रात्री दोन्ही बैल चोरून नेले. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास भरत ईशी करीत आहेत.