अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील एलआयसीचे प्रतिनिधी बाबुलाल पाटील यांनी विमा व्यवसायात जागतिक क्षेत्रातील प्रतिष्ठीत मानला जाणारा एमडीआरटी (USA) २०१९ हा बहुमान अमळनेर शाखेत प्रथम मिळविल्याने त्यांचा अमळनेर एलआयसी शाखेतर्फे सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आमदार स्मिता वाघ, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, डॉ. बी. एस. पाटील, एलआयसी नाशिक विभागाचे सेल्स मॅनेजर प्रदीप जोशी, सुरत येथील प्रतिष्ठीत बिल्डर युवराज पाटील, देशदूतचे संपादक अनिल पाटील,जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, तालुका कृषिअधिकारी भरत वारे,मारवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल फुला, शाखाधिकारी महेंद्र ठाकुर, सेवानिवृत्त विकास अधिकारी गणेश रावतोळे, विकासाधिकारी संजय शेटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
विकास अधिकारी संजय शेटे यांनी प्रास्ताविकात बाबुलाल पाटील यांनी केलेले एम डी आर टी (USA)चे ध्येय सांगितले .पत्रकार संजय पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले. यावेळी उपसरपंच मुरलीधर महाजन, पिंटू राजपूत,प्रा.अशोक पवार ,महेंद्र बोरसे,सचिन पाटील,मुख्तार खाटीक,भागवत पाटील,जी टी टाक, धुळे येथील एलआयसीचे अनिल बेदमुथा गं.का.सोनवणे, अॅड . एस आर पाटील,अरुण चौधरी,अशोक चौधरी, दिलीप पाटील,प्रवीण माळी,सुदाम चौधरी, प्रा.सुरेश महाजन, कृष्णा पाटील,उपशाखाधिकारी वानखेडे, अहिरराव साहेब,किरण महाजन, काशीनाथ महाजन, नगराज महाजन, सुकलाल महाजन, विकासअधिकारी, तुषार झेंडे, आर. बी.पाटील, अजय रोडगे, नितिन पाटील, शहरी व ग्रामीण पत्रकार आदी उपस्थित होते.