अमळनेर (प्रतिनिधी) येथील अॅड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुलचा इयत्ता १२ वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी दुर्वेश उमेश सांगळे याने जेईई मेन्स परीक्षेत ९७.४७ पर्स॔टाईल गुण संपादन करुन घवघवीत यश संपादन केले आहे. त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
उच्यशिक्षीत व अनुभवी शिक्षकांच्या सुयोग्य मार्गदर्शनाने तसेच संस्थेच्या वतीने पुरविण्यात येणार्या अद्ययावत सुविधा तसेच सायन्स लॅब, प्रशस्त लायब्रेरी,कंम्पुटर लॅब यामुळे अमळनेर शहरातून सी.बी.एस.ई च्या विद्यार्थ्यांची यशस्वी वाटचाल सुरु आहे. त्यातील दुर्वेश सांगळे ह्या विद्यार्थ्यांने संपादन केलेले यश ह्या गोष्टीचे ज्वलंत उदाहरण असुन भविष्यात अनेक विद्यार्थ्यांना यशस्वीपणे घडविण्याचा मानस असुन त्यासाठी नेहमीच शर्थीचे प्रयत्न संस्थेच्या वतीने सुरु असतात. ह्या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा अॅड ललिता पाटील,सचिव प्रा शाम पाटील,संचालक पराग पाटील,संचालक प्रा. देवेश्री पाटील,प्राचार्य विकास चौधरी,प्रशासन अधिकारी अमोल माळी यांनी कौतुक केले आहे.