काही समाज कंठकांनी अंबर्शी टेकडीवर झाडे जाळण्याचा केला घातकी प्रकार

अमळनेर (प्रतिनिधी) काही समाज कंठकांनी शहराच्या पूर्वेला असलेल्या अंबर्शी टेकडीवर झाडे जाळण्याचा घातकी प्रकार २० रोजी सकाळी  घडला. यामुळे काही झाडांचे नुकसान झाले असून टेकडी ग्रुपच्या पदाधिकार्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

      या आगीच्या प्रकारात वेगवेगळ्या ठिकाणी या आगी लावण्यात आल्या आहेत. सायकलचे टायर जाळून हा प्रकार केल्याचे टेकडीवर मॉर्निंग वॉक व व्यायाम करणाऱ्यांच्या निदर्शनास आले. पहाटे पहाटे हा प्रकार केला असल्याने सकाळपर्यंत आगीची धग सुरू होती. टेकडी ग्रुपच्या सदस्यांनी नगरपरिषदेला तात्काळ कळवून अग्निशामक बंब मागवला.  कर्मचारी नितीन खैरनार, दिनेश बिऱ्हाडे , फारुख शेख , आंनदा धनगर आदींनी आग विझवली सुमारे १५० मीटरपर्यंत आग पसरली होती. यावेळेस लागलेल्या आगीचे प्रमाण जास्त होते.  यांच्यासह शहरातील प्रतिष्टीत नागरिक , समाजसेवक दररोज सकाळी टेकडीवर येत असतात तरी विघातक कृत्य केले जात असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

टेकडीवरच विध्वंसक प्रकार वाढल्याने सीसीटीव्ही कॅमेरे मागणी

दरम्यान, टेकडीवरच विध्वंसक प्रकार वाढल्याने भविष्यातील अनर्थ घडू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी अंबर्शी टेकडी ग्रुपने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *