भूखंडांचा श्रीखंड खाणाऱ्या फुकट्यांनी नगरपालिकेचे नाट्यगृह वापरले फुकटच

अमळनेर (खबरीलाल) लायन्स क्लब ही विविध व्यवसायांतील आणि उद्योगधंद्यांतील लोकांनी परस्पर-सहकार्य व मानवतेच्या सेवाभावी कार्यासाठी स्थापन केलेल्या मंडळांची (क्लबांची) जगातील सर्वांत मोठी संघटना. तिचे अधिकृत नाव ‘इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज’असे असले, तरी ‘लायन्स इंटरनॅशनल’या नावानेच ती विशेष प्रसिद्ध आहे. मात्र अमळनेरातील पदाधिकाऱ्यांनी या क्लबच्या नावाखाली धंदाच सुरू केला आहे.
यातील बहुतांश पदाधिकारीच मुळात भूखंडांचा श्रीखंड खाऊन मोठे झाले आहेत. त्यामुळे सामाजिक सेवेतूनही ”मेवा” कसा मिळेल, यावरच यांचा डोळा राहत असल्याने सांस्कृतिक आणि सामाजिक सेवेच्या गोंडस नावाखाली त्यांनी ऑर्केस्ट्रा आयोजित करून लाखो रुपयांचा माल गोळा केला.  लायन्स इंटरनॅशनलने आपले लक्ष कृषी, पर्यावरणाचे रक्षण, युवकांसाठी कार्य, नागरिकत्व व देशभक्तीची सुजाण जाणीव, शिक्षण, समाजसुधारणा, आरोग्य, समाज कल्याण, आंतरराष्ट्रीय संबंध व सुरक्षितता, युवकांच्या परदेशभेटी, वृद्धांसाठी व अपंगासाठी कार्य इत्यादींवर केंद्रित केले आहे.
कल्याणकारी कार्यात दवाखाने व रुग्णालये उभारून ते चालविणे, नेत्रचिकित्सा तसेच अंधांकरिता सर्व प्रकारचे साहाय्य, गरजूंना व अपंगांना वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे व मदत करणे तसेच त्यांचे पुनर्वसन, शैक्षणिक, आरोग्यविषयक व सामाजिक सेवाकार्य करणे, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सामंजस्य वाढविणे इ. स्वरूपांची विधायक कामे ही संघटना करते. या कामांवर अमळनेरच्या पदाधिकाऱ्यांनी सपशेल दुर्लक्ष करून भलतेच धंदे सुरू केल्याने या क्लबची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. लायन्स क्लबच्या अनेक शहरातील पदाधिकारी हे आपल्या विधायक कामांनी अंतरराष्ट्रीय स्तरावर आपला डंका वाजवात, मात्र अमळनेरातील पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांनाच डंक मारण्यास सुरुवात केली आहे. यांच्याकडे आर्थिक सुबत्ता असतानाही ऑर्केस्ट्राच्या नावाखाली लाखो रुपये गोळा करून भिकारचोट धंदे करताना थोडीफारही यांना लाज वाटली नाही. यात अधिक खर्च आणि कोणाचाही अडथळा येऊ नये म्हणून सिस्टीमधील सर्व अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करून त्यांना पुढे बसवले. हे पापाचे वाटेकरीही ऑर्केस्ट्रातील चिकनेचोपडे चेहरे पाहून गपगार झाले. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने कार्यक्रम घेतला, असे बोलण्यासाठी आता कोणाचीही दाढ उठत नाही आहे.

अशा कोणत्या आपत्कालीनसाठी निधी केला गोळा..?

अनेकांनी लायन्स क्लबचा आसरा घेऊन पैसे कमवण्याचा दुसरा धंदा सुरू केला आहे. राज्यात महापूर, अतिवृष्टी आली, अनेकांचे संसार उघड्यावर आले. त्यावेळी एखादा कार्यक्रम घेऊन त्यांना मदत केली असती तर अनेकांनी या पदाधिकाऱ्यांना डोक्यावर घेतले असते. पण अशा वेळी पैसे गोळा कारायला यांना लाज वाटते. कारण त्या वेळी त्यांना त्यांचा चिकनेपोपडे आणि धनदांडगेपणा आडवा येतो. मग अमळनेर शहरात किंवा देशात, राज्यात अशी कोणतीही आपत्ती, निमित्त नसतानाही असा कार्यक्रम घेतलाच कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. खरे तर केवळ पैसे उकळण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यासाठी केवळ आपल्या बापाची प्रापॅर्टी समजून नाट्यगृह वापरले. याचा हिशोब त्यांना जनतेला द्यावा लागणार आहे.

संधी साधूंचे असे आहेत गोरखधंदे

या क्लबच्या एका महाभागाने हजारो मील कामगारांना बेरोजगार करण्याचा ‘प्रताप’ केला आहे. याच मिलाच्या भूखंडाच्या श्रीखंडावर कोट्याधीश होऊन अजूनही ढेकर आलेला नाही. माल लगाओ माल मिलेगा अशी त्यांची विचारसरणी असल्याने कुठेही माल मिळवण्यावरच त्यांचा डोळा आहे. ऐढवचे नव्हे तर ज्या महाव्यक्तीने जगाला तत्वज्ञान शिकवले अशा स्वामी विवेकानंद यांच्या नावाचाही व्यापार करून पालकांना भुलथापा देत कोणतीही चांगली सुविधा उपलब्ध करून दिली नाही. तरीही स्वतःला “अग्र”भागी ठेवून स्वच्छ “निरमल” समजतो. यातील एक “ए”- “सी” त  लोकांचा हिशोब ठेवत असल्याने त्यांनाही जळीस स्थळी पैसाच दिसतो. तर अन्य वाहन व्यवसायात असल्याने तोही सुसाट धावतो, आणि अन्य एक ही इमल्यावर इमले बांधत असल्याने यांना कुठेही पैसाच दिसतो.  त्यामुळे आपण अमळनेरचे “दादा” झालो, अमळनेर विकत घेऊ अशा भ्रमात असतील. म्हणूनच ईजी मनी कमवण्याच्या नादात हे कोणत्याही थराला जातील, हे ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमातून दिसुन आले. त्यामुळे या संधी साधूंचे गोरखधंदे यातून उघड झाले आहेत.

क्रमशः

उद्या….

नगरपालिका आपल्या बापाची समजणाऱ्या
नगराध्यक्षांच्या उचा’पतीं’नी मोडू नये काला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *