खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

न्यू व्हिजन स्कूलच्या दशकपूर्ती सोहळ्यामध्ये सोलो डान्स व फॅन्सी ड्रेस स्पर्धेने भरला रंग

अमळनेर (प्रतिनिधी) न्यू व्हिजन स्कूलचा दशकपूर्ती सोहळा उत्साहत पार पडला. यानिमित्ताने भव्य सोलो डान्स व फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला. या स्पर्धांनी या महोत्सवात रंग भरला. तर हा उपक्रम बघता मुलांबरोबर आजी-आजोबांना  बालपणात घेऊन जाऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. सकाळ सत्रात प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉ अपर्णा मुठे व कांचन शहा उपस्थित होते. तर परीक्षक म्हणून अमळनेरच्या सुप्रसिद्ध गायिका अपेक्षा पवार, निलिमा सोनकुसरे उपस्थित होते. त्या प्रसंगी ग्रँड पेरेंट्स डेचे आयोजन देखील करण्यात आले होते. डॉ. अपर्णा मूठे यांनी या सोहळ्याचे कौतुक केले. तर कांचन शहा यांनी या सोहळ्याचा समर्पक शब्दात इतिहास सांगून उपस्थितांची मने जिकली.सायंकाळच्या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी आर. डी. महाजन उपस्थित होते. परीक्षक म्हणून डॉ. मृदुला देशमाने, डॉ. मनीषा भावे, शिल्पा सिंघवी उपस्थित होते. गटशिक्षण अधिकारी यांनी आपल्या मनोगत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जसे शैक्षणिक व क्रीडा गुणांना महत्त्व आहे, तसेच त्यांच्या कला व सांस्कृतिक विकास हाही त्यांच्या विकासाचा अविभाज्य घटक आहे. म्हणून आपण त्यांच्या कलाविष्काराकडे सकारात्मक दृष्टीकोनाने बघणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले
कार्यक्रमाचे मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष शीतल देशमुख, चेअरमन नीलेश लांडगे, उपाध्यक्ष धनराज महाजन, सचिव गोकुळ पाटील, मुख्याध्यापक संदीप महाजन यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक सॅम शिंगाने, राजश्री चौधरी, अनिल माळी, सुरभी सोनवणे, कविता शिसोदे, प्रियंका सोनवणे, भाग्यश्री पदमे, नम्रता बडगुजर, चित्रा बडगुजर, विद्या पाटील, प्रियांका सोनवणे, दीपाली पाटील, नीता जाधव, शीतल निकम,  हेमांगी काळकर, विद्या महाले, कामिनी महाजन ,वंदना मराठे, स्नेहा एकतारे, रितिका मार्कंडेय, मयुरी पाटील, सुचेता शिरसाठ, पूजा महाजन, कल्पना कोराणी, योगिनी ओवे सर्व शिक्षक व तसेच शिक्षकेतर  कर्मचारी अनिता पाटील वंदना सोनार, माधुरी बाळापुरे, माधुरी सोनार, प्रतिभा पाटील, दीपाली पाटील, पंढरीनाथ बाबा यांचे विशेष सहकार्य लाभले. दीपाली राजपूत, फरीन शेख यांनी सूत्रसंचालन केले.  किरण सोनार  यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button