खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी 5 जणांना सहा महिन्यांचा कारावास व प्रत्येकी 500 रुपयांच्या दंडाची शिक्षा 

अमळनेरच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली शिक्षा, न्यायालयाने 5 साक्षीदार तपासले

अमळनेर (प्रतिनिधी) सुटलेली गाय अंगणात आल्याने तिला बांधण्याचे सांगितल्याचा राग आला. त्यामुळे जातीवाचक शिवीगाळ करून महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पारोळा तालुक्यातील कन्हेरे येथील 5 जणांना अमळनेरच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सहा महिन्यांचा कारावास व प्रत्येकी 500 रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
पारोळा तालुक्यातील कन्हेरे येथील मिनाबाई बापू सोनवणे या 31 ऑक्टोबर 2015 रोजी दुपारी 4 वाजता शेजारील शांताराम दौलत पाटील यांची गाय सुटली व ती अंगणात आली.  ती मारकी असून ती खाटेवरील कपडे खाऊन जाईल म्हणून सांगायला गेली असता सताबाई रामदास पाटील, दत्तू रामदास पाटील , भिला पुंडलिक पाटील , सुरेखाबाई पाटील , सोनुबाई दौलत पाटील यांनी अश्लील व  जातीवाचक शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी महिलेने पारोळा पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून 5 जणांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम 3 (1)(10) तसेच दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. सरकारी वकील अॅड. राजेंद्र चौधरी यांनी 5 साक्षीदार तपासले. त्यांना अॅड. प्रशांत संदानशिव यांनी सहकार्य केले. अतिरिक्त जिल्हा सत्र  न्या. राजीव पांडे यांनी साक्षीदारांचे जबाब ग्राह्य धरून 5 ही आरोपीना अट्रोसिटी कायद्यान्वये सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. तसेच प्रत्येकी 500 रुपयांचा दंड सुनावला.  दंगलीच्या प्रत्येक कलमप्रमाणे तीन-तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. पैरवी  अधिकारी म्हणून योगेश पाटील यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button