खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेरातील न्यू व्हिजन स्कुलचा आजपासून दशकपूर्ती महोत्सव आणि स्नेहसंमेलन रंगणार

१७ रोजी दर्जेदार रंगारंग कार्यक्रमांची मेजवानी

अमळनेर(प्रतिनिधी) येथील न्यू व्हिजन इंग्लिश मेडिअम स्कुल यंदा दशकपूर्ती महोत्सव साजरे करीत आहे. यानिमित्ताने दि. ११ ते १७ जानेवारीपर्यंत विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह भरगच्च कार्यक्रम होणार आहे.
या महोत्सवाची जय्यत तयारी पूर्णत्वास आली आहे. आज दि ११ रोजी युवा दिनाचे औचित्य साधून तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे,यावेळी प्रा. धीरज देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे,तर 14 जानेवारी रोजी स्पोर्ट्स डे साजरा होणार आहे, अमळनेरचे भूमिपुत्र तथा टेबल टेनिसचे ख्यातन्याम आंतरराष्ट्रीय खेळाडू विवेक आळवणी यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार असून प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय खेळाडू स्नेहा सोनवणे व अमळनेरचे पोलिस निरीक्षक अंबादास मोरे व तालुका क्रीडा संयोजक एस. पी. वाघ यांची लाभणार आहे.दुपारी 4 ते साय ६ वाजेदरम्यान हा कार्यक्रम होईल.दि १६ रोजी सकाळी ९ ते १२ दरम्यान फेंन्सी ड्रेस कॉम्पिटीशन होणार असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञा डॉ. अपर्णा मुठे व लायनेस च्या माजी प्रेसिडेंट सौ कांचन शाह यांची उपस्थिती लाभणार आहे,१६ रोजी सकाळी डॉ अपर्णा मुठे यांच्या उपस्थितीत आजी आजोबा दिवसाचे नियोजन असून यावेळी विशेष फॅन्सी ड्रेस स्पर्धा रंगणार आहे,तर सायंकाळी 5 वाजता अमळनेरचे तहसीलदार मिलिंद वाघ व प. स. चे गटशिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत सोलो डान्स कॉम्पिटीशन होणार आहे.

१७ रोजी दर्जेदार रंगारंग कार्यक्रमांची मेजवानी

स्नेहसमेलनानिमित्त सायंकाळी ५ वाजता अतिशय दर्जेदार रंगारंग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून याचे उद्घाटन आमदार स्मिता वाघ यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुख्य अतिथी म्हणून आमदार अनिल भाईदास पाटील तर विशेष अतिथी म्हणून माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील व नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमासाठी स्कुलचा संपूर्ण स्टाफ परिश्रम घेत आहे.तरी या महोत्सवाचा सर्व पालक आणि शिक्षण प्रेमींनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन स्कुलचे चेअरमन निलेश लांडगे,अध्यक्ष शितल देशमुख,उपाध्यक्ष धनराज महाजन,सेक्रेटरी गोकुळ पाटील व प्रिन्सिपल संदीप महाजन यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button