पत्रकारांच्या पाठीशी राजकीय, सामाजिक नेत्यांनी उभे राहिले पाहिजे ः आमदार अनिल पाटील

अमळनेर (प्रतिनिधी)- पत्रकार हे निर्भीडपणे आपले वृत्तसंकलन करीत असतात. अनेकदा चांगली बातमी ही अनेकांच्या लक्षात राहत नाही. मात्र दुखावणारी एखाद बातमी ही अनेकांच्या लक्षात राहते. त्यातून आकष निर्माण होऊन पत्रकारांवर दृष्टप्रवृत्तीतून हल्ले केले जातात. अशा वेळी या पत्रकरांच्या पाठीशी सर्वच राजकीय आणि सामाजिक नेते उभे राहिले तर लोकशाहीचा चौथा खांब अधिक मजबूत होईल, असे प्रतिपादन आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केले.
खबरीलाल आणि अमळनेर सेव्हन न्यूजच्या कार्यालयाचे ६ जानेवारी पत्रकारदिनाचे औचित्य साधून उद्घाटन सोहळा पारपडला. या वेळी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले आमदार अनिल पाटील बोलत होते.  ते पुढे म्हणाले की, पत्रकारांना कोणतही सिक्युरीटी नसते. मान्यवरांना नेमप्लेट देऊन एक आगळावेगळा सत्कार या वेळी करण्यात आला. खरे तर ही नेमप्लेट टेबलावरून हलूच शकणार नाही.

साहेबराव दादांचे ब्रेक के बाद
मनोगतही ठरले सर्वांचे आकर्षण

सूत्रसंचालिका रेवती बडगुजर या माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांचा परिचय करून देत असताना माझे खूप कौतुक होत आहे, असे सांगत जितेंद्र ठाकूर आणि महेंद्र रामोशी यांना शुभेच्छा देऊन मनोगत आटोपते घेतले. मात्र पु्न्हा त्यांनी माईक हातात. घेत नेहमीच्या  आपल्या शैलित भाषणाला सुरुवात करून संत तुकारामांच्या अभंगाचा दाखला देत राजकारणात पडणार नाही. या क्षेत्रात लोक सर्व सत्यानाश करून ठेवतात. असे सांगून पुढच्या जन्मी पत्रकार होऊन रुबाबत राहण्याची इच्छा बोलून दाखवली आणि कार्यक्रमात हस्स्याचे फवारे उडाले.

जितेंद्र ठाकूर आणि महेंद्र रामोशी पत्रकारितेतील राम – लक्ष्मणाची जोडी ः आमदार स्मिता वाघ

आमदार स्मिता वाघ यांनी संपादक जितेंद्र ठाकूर आणि महेंद्र रामोशी यांना शुभेच्छा देताना ते पत्रकारितेतील राम- लक्ष्मणाची जोडी असल्याचे सांगितले. रोज नवीन देणे आणि शोधणे खूप कठीण असते. त्यामुळे आजच्या घडीला पत्रकारिता करणे पाहिजे तेवढे सोपे नाही. तरीही हे दोघे पत्रकार अमळनेर शहराचा आणि तालुक्याच्या विकासासाठी नेहमी सजग राहून पत्रकारिता करीत आहेत. त्यांचे काम कौतुकास्पद असेच आहे.

बातमीत मी पणा नसला पाहिजे ः
संपादक रत्नदीप सिसोदिया

सोहळा सुरू असताना पोलिस टु डे चे संपादक रत्नदीप सिसोदिया यांनी ज्या आईमुळे आज आपण मोठे झालो आहोत, त्यांचा व्यासपीठाकडून सत्कार करण्याचे सूचवल्याने संपादक जितेंद्र ठाकूर आणि महेंद्र रामोशी यांच्या आईला व्यासपीठावर बोलवून त्यांचा आमदार स्मिता वाघ यांच्या हस्ते योथोचित सत्कार करण्यात आला. तसेच ज्यांच्यामुळे पत्रकारितेला बळ येत आहे, असा त्यांच्या अर्धांगिणी प्रियंका आणि मंगला यांचाही गौरव करण्यात आल्याने या सोहळा डोळ्यांचे पारणे फडणारा असाच ठरला.

पत्रकार दिन साजरा करण्यासाठी समाजाने पुढे यावे :- तहसीलदार सुदाम महाजन

शिंदखेडाचे तहसीलदार सुदाम महाजन यांनी आपल्या खास शैलित अहिराणीतील ओव्या, गाणी गाऊन सोहळा रंगवला. तर चिमणीच्या चोचीत अडकलेल्या फुटाण्याच्या गोष्टीतून चिमणीला मदत करणाऱ्या मुंगीच्या रुपात पत्रकाराचे महत्त्व सांगितले. तसेच ज्या क्षेत्राचा दिन असतो, त्यांनीच तो साजरा करण्याची प्रथा असल्याची खंत व्यक्त करून पत्रकार दिन साजरा करण्यासाठी समाजाने पुढे यावे, असे सांगितले.

प्रशासनाचा चांगला चेहरा दाखवण्याचे
केले काम ः तहसीलदार ज्योती देवरे

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे म्हणाल्या, खबरीलाल आणि अमळनेर सेव्हन न्यूजने नेहमीच प्रशासनाचा चांगला चेहरा दाखवला आहे. त्यामुळे शासनाचा योजना या सर्वसामान्य मानसांपर्यंत पोहचवण्यात यश आले. त्यांच्या प्रेमापोटीच तीन टर्मचे तीन तहसीलदार  या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहिले. म्हणूनच अमळनेरच्या मातीतले पत्रकारितेची ही दोन रत्ने आहेत. असे सांगून स्वरचित कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

पोलिस निरीक्षक अनिल बडगुजरांनी
सादर केलेल्या कवितेने पाणावले डोळे

पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर म्हणाले जितेंद्र ठाकूर हे निर्भिडपणे पत्रकारिता करीत आहेत. आम्ही मित्र जरी असलो तरी अनेकदा चुकीच्या ठिकाणी त्यांनी लेखन केले. अनेकांचा रोषही पत्कारला. त्यांची पत्रकारिता अशीच बहरत रहो, अशा सदिच्छा देऊन त्यांनी हंभरून वासराल चाटते जव्हा गाय… ही कविता सादर करून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणले. यामुळे हा सोहळा क्षणभर अत्यंत भाऊक झाला होता.

पत्रकाररत्न माता आणि अर्धांगिनीचा गौरव सोहळा ठरला डोळ्यांचे पारणे फेडणारा

ज्या आईमुळे आज आपण मोठे झालो आहोत, त्यांचा व्यासपीठाकडून सत्कार करण्याचे सूचवल्याने संपादक जितेंद्र ठाकूर आणि महेंद्र रामोशी यांच्या आईला व्यासपीठावर बोलवून त्यांचा आमदार स्मिता वाघ यांच्या हस्ते योथोचित सत्कार करण्यात आला. तसेच ज्यांच्यामुळे पत्रकारितेला बळ येत आहे, असा त्यांच्या अर्धांगिणी प्रियंका आणि मंगला यांचाही गौरव करण्यात आला.

 

स्नेह भोजनाच्या मेजवानीने वाढवली लज्जत….

कोणत्याही सोहळ्याचा शेवट हा प्रिती आणि रुचकर भोजनाने होते. या सोहळ्याताही खास स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेह भोजनाचे विशेष म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही प्रकाराचे भोजन होते. त्यात बाडगीत नॉनव्हेजचे जेवन हे खास आकर्षणाचे ठरले. या वेळी अनेकांना बाडगीत नॉनव्हेज खान्याचा मोह आवरता आला नाही आणि या भोजनाने या सोहळ्याची लज्जतही वाढवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *