अमळनेर (प्रतिनिधी)आपल्याला विविध न्याय मागण्यांसाठी शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी बुधवारी पुकारलेल्या देशव्यापी संपामुळे शासकीय कामकाज ठप्प झाले होते. तर महसूल कार्यालयातील तसेच पंचायत समितीच्या कामानिमित्त आलेल्या नागरिकांना व विविध दाखल्यांसाठी फिरणार्या विद्यार्थ्यांना खाली हात परत जावे लागले. मात्र तलाठी व ग्रामसेवक हे पीएम किसानची कामे करत होते.
तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना , मुख्याध्यापक संघटना , महसूल कर्मचारी संघटना , ग्रामसेवक संघटना , विस्तार अधिकारी संघटना तसेच मोबाईल विक्रेते दुकानदार आपापल्या विविध मागण्यांसाठी देशव्यापी बंद मध्ये सहभागी होऊन संपावर उतरले आहेत कृषी विभाग , खाजगी प्राथमिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना दिले निवेदन
महसूल कर्मचारी संघटनेने उपविभागीय अधिकारी सीमा आहिरे , तहसीलदार मिलिंद वाघ याना निवेदन देऊन संपावर उतरले आहेत. यावेळी नायब तहसीलदार कमलाकर जोशी , शिरस्तेदार राजेंद्र चौधरी ,नायब तहसीलदार ए. जे. वळवी , ए. एम बागुल , पी एस धमके , पी एच अहिरराव , बी एच. शेवाळे ,पुरवठा निरीक्षक आर. पी. साळुंखे , व्ही. एच. पाटील, आर. जे. शिरसाठ उपविभागीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिनेश सोनवणे , तहसील कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भूषण पाटील , संदीप पाटील , कपिल पाटील , किरण मोरे ,गंगाधर सोनवणे , नितीन ढोकने , सुनील गरूडकर ,सुषमा पाटील आदी कर्मचारी उपस्थित होते.
शैक्षणिक आणि राष्ट्रीयकृत बँक कर्मचारीसंघटनाही झाल्या सहभागी
मुख्यध्यपक संघटनेचे तालुकाध्यक्ष एम. ए. पाटील , तुषार पाटील , प्रकाश पाटील , माध्यमिक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील , टी. डी. एफ. संघटनेचे सुशील भदाणे , शिक्षक भारतीचे आर जे पाटील , जुनी पेन्शन योजना संघटनेचे प्रभूदास पाटील, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कैलास पाटील , सचिव सुनील चौक , ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष संजय भाईदास पाटील , सचिव संजीव सैंदाने , विस्तार अधिकारी एल. डी. चिंचोरे , अनिल राणे आदींनी आपापल्या विभागाचे कर्मचारी संपावर असल्याचे सांगितले.
कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संपला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रीयकृत बँक कर्मचारी देखील संपावर होते. वर्कर्स फेड्रेशन वीज कर्मचारी देखील संपावर विद्युत कायदा २०१८ मुळे खाजगीकरणास वाव मिळणार असून कामगार कपात होणार आहे. म्हणून हा कायदा मंजूर होऊ नये यासाठी देशव्यापी बंद मध्ये सहभागी होऊन वर्कर्स फेड्रेशन वीज कर्मचारी देखील संपावर असल्याचे वर्कर्स फेडरेशन चे प्रदेश सचिव पी. वाय. पाटील यांनी सांगितले.