खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

डॉ. गीताली मंदाकिनी आज माध्यमे व स्‍त्री-पुरुष समानता’ या विषयावर टाकणार प्रकाश 

साने गुरुजी कर्मभुमी स्‍मारक प्रतिष्ठान व शिवशाही फाऊंडेशन यांच्‍यातर्फे  व्याख्यानाचे आयोजन 

अमळनेर (प्रतिनिधी) साने गुरुजी कर्मभुमी स्‍मारक प्रतिष्ठान व शिवशाही फाऊंडेशन यांच्‍यातर्फे पत्रकार दिनानिमित्त ज्येष्ठ लेखिका तथा संपादिका प्रा. डॉ. गीताली विनायक मंदाकिनी (पुणे) यांचे सोमवार दिनांक ६ रोजी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. जी. एस. हायस्‍कुलच्‍या आएमए हॉलमध्ये सायंकाळी सहा वाजता व्याख्यानाला सुरवात होईल.
साने गुरजी कर्मभुमी स्‍मारक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. ए. जी. सराफ अध्यक्षस्‍थानी राहतील.
प्रा. डॉ. गीताली विनायक मंदाकिनी यांचे ‘माध्यमे व स्‍त्री-पुरुष समानता’ या विषयावर व्याख्यान देतील. तसेच यावेळी पत्रकार दिनाच्या पार्श्वभुमीवर पत्रकारांचा सन्‍मानही केला जाणार आहे. तरी कार्यक्रमाला उपस्‍थित राहावे, असे आवाहन स्‍मारक प्रतिष्ठानच्या कार्यवाहक दर्शना पवार ,शिवशाही फाऊंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे व सचिव उमेश काटे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button