देवगाव देवळी हायस्कूलमध्ये वकृत्व स्पर्धेतून सावित्रीबाई फुले यांच्या जिवन कार्याला उजाळा

अमळनेर (प्रतिनिधी) देवगाव देवळी हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने वकृत्व  स्पर्धा घेण्यात आली. शाळेचे सांस्कृतिक  विभाग प्रमुख आय. आर. महाजन अध्यक्षस्थानी होते.
व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन तर प्रमुख अतिथी शाळेचे शिक्षक अरुण सोनटक्के ,एच.ओ माळी, एस .के .महाजन लिपिक एन.जी देशमुख होते. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे सांस्कृतिक  विभाग प्रमुख आय आर महाजन यांनी केले.
देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यात शाळेतील ३५ विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला इयत्ता आठवी ते दहावीतील पहिल्या पाच विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष आय आर महाजन यांच्याकडून पेन व पुस्तक देण्यात आली. यात  प्रथम नेहा पाटील (९ वी), द्वितीय हर्षाली महाजन(१० वी), तृतीय नंदीनी जाधव(८ वी). उत्तेजनार्थ प्रशांत पाटील(8वी),नंदीनी डांगे(९ वी).
शाळेचे शिक्षक एच.ओ. माळी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे शिक्षक एस के महाजन यांनी मानले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *