अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर नगरपरिषद व अमळनेर महिला मंच ट्रस्टच्या वतीने शुक्रवारी महिलांसाठी झालेल्या वॉकथॉन स्पर्धेत मोठ्या गटात लता भिल तर लहान गटात गृहिणी तृप्ती भदाणे विजयी झाल्या आहेत. या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
समाजातील मोलमजुरी करणाऱ्यापासून ते उद्योग व्यवसाय नोकरी करणाऱ्या विवाहित महिलांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. २१ ते ६३ वयापर्यंतच्या सुमारे १५० महिलांनी स्पर्धेत सहभागी घेतला. सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करून मोठ्या गटाच्या महिलांच्या स्पर्धां पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या हस्ते तर लहान गटाच्या स्पर्धा जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील व डॉ. अपर्णा मुठे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरू करण्यात आल्या. धार – मारवड रस्त्यावर चार किमी पायी चालण्याची स्पर्धा होती.
वॉकथॉन स्पर्धेत विजयी महिला
मोठ्या गटात प्रथम लता भिल , द्वितीय वनश्री अमृतकार , तृतीय सपना पहाडे, चतुर्थ क्रमांक अलका पाटील यांनी तर लहान गटात प्रथम क्रमांक तृप्ती भदाणे, द्वितीय शिल्पा सिंघवी , तृतीय क्रमांक सरला जैन चतुर्थ क्रमांक ममता भिल यांनी मिळवला. विजेत्या महिलांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. मंजुश्री जैन , करूणा सोनार , जस्मिन भरूचा , आरती रेजा, प्रा. रंजना देशमुख , सरोज भावे , माधुरी पाटील , कांचन शाह , प्रा. शिला पाटील , डॉ. रवींद्र जैन , दिनेश रेजा , पद्मजा पाटील उपस्थित होते.