अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव येथे झालेल्या विद्यापीठ अविष्कार २०१९ या स्पर्धेत प्रताप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठ आयोजित अविष्कार २०१९ ही स्पर्धा नूतन मराठा कॉलेज,जलगाव येथे दिनांक ३० डिसेंबर रोजी झाली.या स्पर्धेत १००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. होता. विध्यर्थ्याना संशोधन समजावे, प्रेरणा मिलावी, संशोधक निर्माण व्हावेत हे मागचे प्रयोजन आहे.
विद्यापिठ फेरी करिता पुढील विध्यर्थी पात्र ठरले.त्यात प्रामुख्याने सौरभ सदानंद पाटील (राज्यशास्त्र), संशोधक विनोद नाईक(अर्थशास्त्र), संशोधक अर्जुन पावरा(अर्थशास्त्र), मनिष हिरे व अमित जाधव(संख्या शास्त्र), प्रतिक्षा शर्मा (वाणिज्य), वर्षाली शहा(वाणिज्य), देवयानी चौधरी व दिव्या पाटील (वाणिज्य), मयूर पाटील व सागर पाटील (संख्या शास्त्र), अमेय पाटील व गणेश महाजन(पदार्थ विज्ञान), पल्लवी बाविस्कर व राज कमल पाटील(सूक्ष्म जीव शास्त्र ) अशा १५ विध्यार्थ्याचा यात समावेश आहे. या स्पर्धेची दुसरी फेरी ही ८ व ९ जानेवारी रोजी विद्यापिठ येथे होणार आहे.