अमळनेर(प्रतिनिधी) येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेत सावित्रीच्या लेकींनी स्व: संरक्षणाचे धडे गिरवून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली. कराटे प्रशिक्षक एस. वाय. करंदीकर यांनी विदार्थिनींना प्रशिक्षित केले. मुख्याध्यापक रणजित शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक रणजित शिंदे, कराटे प्रशिक्षक एस. वाय. करंदीकर यांनी पुष्पहार अर्पण केला.उपस्थित शिक्षक आनंदा पाटील, संगिता पाटील, गीतांजली पाटील, ऋषिकेश महाळपूरकर आदिंनी पुष्प अर्पण करून पूजन केले. सुत्रसंचालन परशुराम गांगुर्डे यांनी केले तर आभारप्रदर्शन धर्मा धनगर यांनी केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे दिलीत.याप्रसंगी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापक रणजित शिंदे व कराटे प्रशिक्षक एस.वाय. करंदीकर यांनी मार्गदर्शन केले.