डीडीआर व कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांना  कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांनी दिले निवेदन 

अमळनेर (प्रतिनिधी) डीडीआर व कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांना  कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेश देशमुख , संचालक सुरेश पिरन पाटील , काँग्रेस ता.अध्यक्ष गोकुळ आबा पाटील , माजी प्रेसिडेंट शेतकी संघ संजय पाटील , गौरव पाटील ,हिंमत पाटील ,कुंदन निकम यांनी निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, मागील शासनाच्या कर्जमाफी योजनेमुळे २०१७ पासून शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफीचा लाभ न मिळाल्यामुळे संस्था बँक स्थरावर थकीत झाल्या आहेत .सहकार घटना दुरुस्ती ९७ नुसार जे डी सी सी बँकेच्या २०२० सार्वत्रिक निवडणुकीत संस्थाचे प्रतिनिधी ठराव मागवंतांना थकीत संस्थचे पंच कमिटी ऐवजी इतर सभासदांमधून ठराव करण्याची अट असल्याने पंच कमिटी ठरावाच्या अधिकारापासून वंचित राहतील. नवीन शासनाच्या कर्जमाफी धोरणानुसार मार्च २०२० पर्यंत  कर्जमाफी झाल्यावर थकीत संस्था बँक स्थरावर नियमित होतील. त्यानंतर ठराव मागितल्यास पंचकमिटीस ठरावाचा अधिकार मिळेल. त्यामुळे ही प्रकिया मार्च २०२० नंतर राबवावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *