अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील इस्लामपुरा भागात बचत गटाच्या कर्जाच्या परतफेडीच्या वादावरून चौघांनी एक महिलेस मारहाण केल्याची घटना १ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,अमोल वाघ (रा. रावेर) , आकाश पाटील (रा. अमळनेर) , महेंद्र पाटील (बोदवड) व त्यांच्यासोबत एक अनोळखी महिलेने इस्लामपुरा भागातील शमीनानाज इम्रान शेख या महिलेस तिच्या घरासमोर जाऊन चापट बुकय्यानी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच बाहेरून गुंड आणून मारण्याची धमकी दिली. महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.