अमळनेर (प्रतिनिधी) मूळ नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील एक १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला फुस लावून अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना ३१डिसेंम्बर रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास अमळनेर शहरातील शिरूड नाका भागातील हनुमाननगर येथे घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेश बबन चव्हाण मूळ (रा. श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर) हा आपल्या पत्नी व व फक्त पहिली शिकलेली मुलीसह कामानिमित्त अमळनेर येथे ८ महिन्यांपूर्वी राहायला आला होता. तो मोलमजुरी करून आपली उपजीविका करत होता. ३१ डिसेंबर रोजी त्याची पत्नी सुनीता आजारी पडल्याने त्याने सायंकाळी डॉ. बागवान यांच्याकडे नेले. तेव्हा मुलगी घरी एकटी होती. मात्र रात्री साडे आठ वाजता दवाखान्यातून परत आल्यानंतर त्याची १४ वर्षाची मुलगी घरी नव्हती. त्यांनी गल्लीत व इतरत्र नातेवाईकांकडे शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु मुलगी आढळून न आल्याने कोणीतरी फूस लावून तिला पळवून नेल्याची त्याची खात्री झाली म्हणून अमळनेर पोलीस स्टेशनला भादवी कलम ३६३ प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल राजेश चव्हाण करीत आहेत.