अमळनेर(खबरीलाल) अमळनेर नगरपरिषदेच्या विविध सहा विषय समिती सदस्यांची निवड बुधवारी दि. १ जानेवारी रोजी विशेष सभेत करण्यात आली. यात नगरसेवक संजय मराठे, विवेक पाटील व सलीम टोपी या तिघांना महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर संधी मिळाली आहे. यावेळी त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.
पिठासन अधिकारी तहसिलदार मिलिंद वाघ यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. विशेष सभेसाठी आवश्यक ती गणपूर्ती झाल्यानंतर सकाळी ११ वा सभेच्या कामकाजास सुरुवात झाली. सर्व गटनेते व सर्व सभासदांनी चर्चा करुन स्थायी समिती साठी ३ सदस्य व इतर विषय समित्यांसाठी प्रत्येकी ११ सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात यावे असे आवाहन पिठासन अधिकाऱ्यांनी केल्यानंतर प्रत्येक गटाच्या गटनेत्यांनी प्रत्येक समितीसाठी संख्याबळानुसार नामनिर्देशन प्रस्ताव सादर केले. यात पाचही ११ सदस्यीय समितीमध्ये अमळनेर तालुका शहर विकास आघाडीच्या गटनेत्या पुष्पलता साहेबराव पाटील यांनी प्रत्येकी ६, शिरिषदादा चौधरी मित्र परिवार (आघाडी) गटनेता प्रविणकुमार शशिकांत पाठक यानीं ३, शिवसेना गटनेत्या संगिता संजय पाटील यांनी २ नावे दिलीत. त्या नावाना पिठासन अधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यानंतर सहाही समित्या गठीत करण्यात आल्या. या सदस्यांमधून लवकरच विषय समिती सभापतींची निवड केली जाणार आहे. तसेच महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीत शहर विकास आघाडीतर्फे संजय मराठे व विवेक पाटील तर शिरीषदादा आघाडीतर्फे सलीम टोपी यांची निवड करण्यात आली. सभेला नगराध्यक्ष पुष्पलता पाटील,उपनगराध्यक्ष विनोद लाबोळे, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर सह सर्व नगरसेवक उपस्थित होते.सभा लिपिक म्हणून महेश जोशी यांनी कामकाज पाहिले.
गठीत समित्या पुढीलप्रमाणे
सार्वजनिक बांधकाम समिती
चौधरी नरेंद्र विष्णू, पाटील संतोष भगवान, पाटील सुरेश आत्माराम, संदानशिव नरेंद्र रामभाऊ, पाटील मनोज भाऊराव,पाटील संगिता संजय,पाठक प्रविणकुमार शशिकांत, साळुखे चंद्रकला अशोक, पाटील कुमार रामकृष्ण बापुराव, महाजन देविदास भगवान, महाजन रत्नाबाई प्रकाश.
स्वच्छता वैधक व सार्व. आरोग्य समिती
पाटील संतोष भगवान, पवार राधाबाई संजय, संदाशिव नरेंद्र रामभाऊ, लोहरे माया कैलास, संदानशिव सविता योगराज, पाटील घनश्याम जयवंतराव, अग्रवाल निशांत राजेंद्र, साळुखे चंद्रकला अशोक, जाधव किरणबाई राजू, माळी रत्नमाला साखरलाल, महाजन रत्नाबाई प्रकाश.
नियोजन व विकास समिती
चौधरी नरेंद्र विष्णू,यादव शितल राजेंद्र, पाटील मनोज भाउराव,पाटील घनश्याम जयवंतराव, पाटील चेतना यज्ञेश्वर,भिल संजय महादू,पाठक प्रविणकुमार शशिकांत,साळुखे चंद्रकला अशोक, पाटील कमलबाई पितांबर, महाजन देविदास भगवान, लांबोळे विनोद रामचंद्र.
शिक्षण क्रिडा व सांस्कृतिक कार्य समिती
यादव शितल राजेंद्र,पाटील नुतन महेश, संदानशिव सविता योगराज,पाटील गायत्री दिपक पाटील, चेतना यज्ञेश्वर पाटील,चौधरी कल्पना पंडीत,अग्रवाल निशांत राजेंद्र, महाजन ज्योती धनंजय, पाटील कुमार रामकृष्ण बापुराव, कमलबाई पितांबर पाटील, शिंपी प्रताप अशोक.
पाणीपुरवठा जलःनिस्सारण समिती पाटील संतोष भगवान,संदानशिव नरेंद्र रामभाऊ
पाटील मनोज भाउराव,पाटील गायत्री दिपक,चौधरी कल्पना पंडीत,अग्रवाल निशांत राजेंद्र,बागुल आशा किरण, पाटील कुमार रामकृष्ण बापुराव,पाटील राजेश शिवाजीराव, शिपी प्रताप अशोक,जाधव किरणबाई राजू.
महिला व बालकल्याण समिती
यादव शितल राजेंद्र, कुरेशी निशातबानो अनिस खान, लोहेरे माया कैलास,पाटील गायत्री दिपक,पाटील चेतना यज्ञेश्वर, पाटील संगिता संजय बागुल, आशा किरण, महाजन, ज्योती धनंजय महाजन, पाटील कमलबाई पितांबर,माळी रत्नमाला साखरलाल, महाजन रत्नाबाई प्रकाश.