अमळनेर(खबरीलाल) तालुक्यातील पळासदळे येथील सुमारे तेरा आदिवासी वृद्ध महिलांना संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेसाठी पात्र ठरविण्यात आले. यामुळे या महिलांना मोठा आधार मिळाला आहे.
या महिलांना लाभ मिळवून देण्याकरिता लाभार्थीचे दरवर्षी हयातीचे दाखले मिळवून देण्यासाठी माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांचे मार्गदर्शनाखालील शंकर खैरनार यांनी मदत व सहकार्य करून लाभार्थी पात्र ठरविले आहेत. यासाठी आदिवासी वृद्ध महिलांच्या शिष्टमंडळाने लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता साहेबराव पाटील यांनी मदत केली असून या प्रसंगी कामगार नेते रामभाऊ संदांशिव, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गोकुळ बोरसे, विक्रांत नाना पाटील, फयाज खाँ पठाण, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.