अमळनेर (खबरीलाल) थकीत पगार अदा करण्यात यावेत, तलाठी व ग्रामसेवकप्रमाणे वेतन श्रेणी लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीच्या गटसचिवांनी मागण्या मान्य होईपर्यंत महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचे काम करण्यास नकार दिला आहे. यासंदर्भात त्यांनी सहाय्यक निबंधक यांना निवेदन देण्यात आले आहे.
सर्व ३२ गटसचिवांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सहकार अधिकारी सुनील महाजन याना दिले आहे. निवेदनावर सुनील पाटील , कैलास पाटील , विजय पाटील, कृष्णकांत भावसार , जयराम पाटील , गुलाबसींग पाटील , उत्तमराव पाटील , प्रवीण पाटील , सुधाकर पाटील , बाळू पाटील , भगवान पाटील , भगवंतसिंग साळुंखे , पितांबर पाटील , मधुकर बोरसे , नितीन पवार , रातीलाल महाजन , विलास पाटील ,गुलाब गायकवाड , ज्ञानेश्वर पाटील, राजेंद्र वाणी ,रवींद्र खैरनार , भरत पाटील ,श्याम पाटील ,रवींद्र पाटील , रमेश अहिरे ,रमेश माळी, राजेंद्र पाटील ,संजय पाटील , विलास पाटील , भगवान पवार , गुलाब मोरे , शांताराम पवार यांच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रति लेखाधिकारी , जळगाव जिल्हा बँकेचे उपविभागीय व्यवस्थापक याना देण्यात आल्या आहेत.
गटसचिवांनी या विविध मागण्यांसाठी
दिला आहे काम करण्यासाठी नकार
थकीत पगार अदा करण्यात यावेत, नोव्हेंबर, डिसेंबरचे २ महिन्यांचा पगार आधी द्यावा, संस्था पातळीवर कर्ज वसुली नसल्याने कर्ज माफी कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, संस्था पातळीवर कर्ज वसुलीतून जॉईंट फंड भरणा करण्याची परवानगी द्यावी, तलाठी व ग्रामसेवकप्रमाणे वेतन श्रेणी लागू करून दर महिन्याच्या 5 तारखेला पगार करण्याची तरतूद शासन पातळीवर करण्यात यावी आदी मागण्या गटसचिवांच्या आहेत.