अमळनेरात वाळू चोरट्यांची हिम्मत वाढली तहसील कार्यालयातून जप्त तीन वाहने पळवली

अमळनेर (खबरीलाल) अमळनेरात वाळू चोरट्यांची हिम्मत वाढली असून तहसीलदारांनी चोरटी वाळू वाहतूक करताना पकडलेली व जप्त केलेली साडे चार लाखाची तीन वाहने दोघांनी तहसील आवारातून चोरून नेल्याची घटना २९ डिसेंबर २०१९ रोजी रात्री घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, तहसीलदार मिलिंद वाघ व  त्यांच्या पथकाने चोरटी वाळू वाहतूक करताना रुबजीनगर येथील अकबरखा , युसूफखा पठाण याचे टेम्पो (क्रमांक एमएच- ०२, वाय ए- ८९६१) , (एमएच- ०२ , एक्सए- ८६०१) व हिंगोने खुर्द येथील भैया शांताराम पाटील यांचे वाहन (एमएच- ०२ , वाय ए- ८७६१)  वाळू सह जप्त केली होती. २९ रोजी रात्री तहसील आवारातून सुमारे ४ लाख ५६ हजार रुपये किमतीची तिन्ही वाहने तहसील आवारातून चोरून नेली.

लिपिकाने सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यावर
आढळून आले दोघे वाहन चोरटे

 

३० रोजी सकाळी लिपिक संदीप पाटील यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी तहसीलदार मिलिंद वाघ , तलाठी आशिष पारधी व प्रवीण सोनवणे यांच्याशी चर्चा करून सीसीटीव्ही तपासले असता अकबरखा पठाण व भैया पाटील या दोघांनी ही वाहने चोरीस गेल्याचे स्पष्ट झाल्याने संदीप पाटील यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल संजय नारायण पाटील करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *