शहराच्या स्वच्छतेत महत्वाचे योगदान देणार्‍या सफाई  कर्मचार्‍यांना गणवेशाचे केले वाटप

अमळनेर (खबरीलाल) शहराची स्वच्छता करण्यासाठी महत्वाचे योगदान असलेल्या अमळनेर नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना नववर्षाच्या पूर्वसंध्येला गणवेश वाटप करण्यात आले.
प्रभाग क्रमांक १७ चे नगसेवक विनोद लांबोळे व रत्नाबाई महाजन यांच्यातर्फे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला आरोग्य निरिक्षक युवराज चव्हाण, संतोष बिऱ्हाडे, प्रकाश महाजन,नरेंद्र चौधरी,पप्पु महाजन, भरत महाजन, सागर महाजन,दादू महाजन, निलेश भोई, देविदास भोई, नितीन भदाणे, मंगेश महाजन,आदी नागरिक उपस्थित होते.

सफाई कर्मचारीचा स्वच्छता राखण्याकामी मोलाचे योगदान : माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील

या कार्यक्रमाप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नगरपालिकेच्या सफाई कर्मचारीचा स्वच्छता राखण्याकामी मोलाचे योगदान असते,तसेच अमळनेर नगरपालिकेला हागणदारीमुक्तचा पुरस्कार मिळण्यामागे सफाई कामगार यांचा सुध्दा खारीचा वाटा आहे.

या सफाई कर्मचार्‍यांना वाटप केले गणवेश

दरम्यान मुकादम बलराम हटवाल, समाधान थोरात, सचिन ढिवरे, रविंद्र बिऱ्हाडे, दिलीप बिऱ्हाडे, संतोष बैसणे, योगेश संदानशिव,भगवान मैराळे,रविंद्र सोनवणे, रमाबाई सपकाळे, मिनाबाई सरदार, गोविंदा लोहरे, दिपक कलोसे, करण कलोसे, सरिताबाई भुरट, सविता कल्याणे यांना गणवेश वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *