अमळनेर (खबरीलाल) येथील यश बँकेच्या बीएनए मशीन मध्ये रंगीत झेरॉक्स काढलेली बनावट २०० रुपयांची नोट भरून फसवणूक केल्याची घटना २१ डिसेंबर रोजी घडली असून याप्रकरणी बुधवारी अनोळखी व्यक्तींविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे अमळनेर शहरात बनावट चालवण्याचे रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यश बँकेत २१ रोजी वरिष्ठ कार्यालयाकडून इमेल आला की अमळनेर शाखेत बीएनए मशीन मध्ये २०० रुपयांची बनावट नोट आली आहे. त्यांनतर मशीन हाताळणाऱ्या पथकाला ती नोट( ४ ए एन ३८४२१५) आढळून आली. ही नोट रंगीत झेरॉक्स काढलेली असल्याचे स्पष्ट झाले. ही नोट बीएनए मशीन मध्ये २१ रोजी दुपारी १२ वाजून २२ मिनीटानी टाकण्यात आली आहे. बँकेच्या नियमानुसार महिना संपल्यांनातर व्यवस्थापक दादासाहेब भागीनाथ होळकर यांनी अनोळखी व्यक्तींविरुद्ध भादवी ४८९ क प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल संजय वना पाटील करीत आहेत.