तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या विवाहितेचा विहिरीत तरंगतांना आढळला मृतदेह

अमळनेर (खबरीलाल) कलागुरु मंगल कार्यालयमागील श्रीरामनगरमधून तीन दिवसांपूर्वी  बेपत्ता झालेल्या विवाहितेचा मृतदेह २९ रोजी सायंकाळी ५ वाजता विहिरीत तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्या किंवा घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

      सपना महेंद्र सोनवणे ( वय २५) ही  वावडे येथील महेर असलेली महिलेचे सासर मारवड येथील असून ती अमळनेर येथे राहत होती. २७ डिसेंबरपासून कलागुरु मंगल कार्यालयमागील श्रीरामनगरमधून काही न सांगता निघून गेली होती. तिच्या पतीच्या खबरीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली होती. २९ रोजी सायंकाळी ५ वाजता तेथील एका विहिरीत तिचा मृतदेह तिच्या नातेवाईकांना  तरंगताना आढळून आला. पाण्यात बुडवून तिचा मृत्यू झाला आहे. पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास एपीआय गणेश सूर्यवंशी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *