अमळनेर (खबरीलाल) पोलिसांनी गावठी हातभट्टीवर धडक कारवाई केली. शहरातील बहादरपूर रोड, ताडेपुरा, सम्राट हॉटेल जवळ छापा टाकून ५ हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या असून ५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, सपोनि गणेश सूर्यवंशी व पोलीस रवी पाटील, हितेश चिंचोरे , शरद पाटील ,दीपक माळी, भूषण पाटील यांनी बहादरपूर रस्त्यावर छापा टाकून शोभाबाई शिवाजी यांच्याकडे २१५० रुपये किमतीची २०० लिटर रसायन व ४० लिटर दारू , मीनाक्षी सूरज कंजर यांच्याकडे १२०० रुपयांची २५ लिटर दारू व २०० लिटर रसायन ,श्रीकांत कंजर यांच्याकडे ४५० रुपयांची १५ लिटर दारू तर ताडेपुरा भागात मालाबाई अशोक कंजर हिच्याकडे ७६८ रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या व सम्राट हॉटेल जवळ सरलाबाई संदीप भिल हिच्याकडे ६०० रुपयांची २० लिटर दारू असा माल जप्त करण्यात आला असून चार हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत आरोपींविरुद्ध दारूबंदी कायद्यांव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.